Mumbai Police Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Police: भरदिवसा पडलेल्या सशस्त्र दरोड्याची 48 तासात उकल, विश्वास नांगरे पाटलांची पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप

मुलुंड पाच रस्ता येथे एका व्यावसायिकाच्या कार्यालयात चोरांनी बंदुकीचा धाक दाखवत चोरी केली.

जयश्री मोरे

मुंबई: कानुन के हाथ लंबे होते है, यांची प्रचिती मुंबई पोलिसांनी खरी केली आहे. 2 फेब्रुवारीला मुलुंड पाच रस्ता येथे एका व्यावसायिकाच्या कार्यालयात चोरांनी बंदुकीचा धाक दाखवत चोरी केली. चोरी करुन चोर देवदर्शनालाही गेला. चोरी केल्यावर दान पेटीत चोरीचे पैसेही टाकले. हा चोरटा वेष पालटून चोरी करत होता. पोलिसांनी अवघ्या 48 तासात या चोरांच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत (Armed robbery solved by Mulund police in 48 hours appreciation from Vishwas Nangre Patil).

नेमकं काय घडलं?

2 फेब्रुवारीला मुलुंड पोलीस (Mulund Police) ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा दरोडा टाकला गेला होता. मुलुंडमधील पाच रस्ता येथे व्हि.पी. एंटरप्रायझेस या ऑफिसमध्ये शस्त्रासह दरोडा टाकुन ऑफिसमधील लोकांना दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाक दाखवून ऑफिसमधील 70 लाख रुपयांची रोकड जबरीने चोरून घेऊन गेले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला होता. मात्र, कोणताही इतर पुरावा हाती लागत नसताना पोलिसांनी अवघ्या 48 तासात सर्व आठ आरोपींना अटक केली आहे.

दरोडेखोर पाढंऱ्या रंगाच्या एका मारुती ईको व्हॅनमधून घटनास्थळी आले आणि त्याच व्हॅन मधून पळुन गेले. परंतु दरोडेखोर यांनी गुन्हेगारी शक्कल वापरुन त्यांनी ईको व्हॅनच्या नंबर प्लेट्स वेळोवेळी बदलल्याने तसेच त्यांनी आपले कपडे बदलुन वेशांतर केले. तर एका आरोपीने चक्क टक्कल करत विग घातला. वेशांतर केल्याने आणि गाडीची नंबर बदल करत असे त्यामुळे दरोडेखोरांची ओळख पटविणे तपासाच्या दृष्टीने जिकरीचे झाले होते.

चोरी केल्यानंतर मध्यप्रदेशात जाऊन केले महाकालचे दर्शन

मात्र, पोलिसांनी (Police) वेगवेगळ्या 12 टीम बनवत आरोपींना अटक (Arrest) केली आहे. तपासात यातील एक आरोपी हा कर्जतचा असून तो इतर गुन्हेगारांना माहिती पुरवत होता. तर या आरोपींपैकी मोनू हा उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) सराईत गुन्हेगार असून त्याने एका राजकिय नेत्यांची हत्या केली आहे. तर मोनू आणि गगनने चोरी केल्यानंतर मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथील महाकाल येथे जाऊन दर्शन घेतले आणि दान पेटीत दान ही केले.

पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 37 लाख रोकड हस्तगत करण्यात आली असून एकूण 4 पिस्टल, 2 कट्टे 27 राउंड, दोन मॅग्जीन, तीन वाहने आणि आरोपींनी अंगावरील बदली केलेले कपडे, गाडयांच्या वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबर प्लेट्स इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT