'आपण मजूर आहात का?..' प्रविण दरेकरांना सहकार विभागाची विचारणा SaamTV
मुंबई/पुणे

'आपण मजूर आहात का?..' प्रविण दरेकरांना सहकार विभागाची विचारणा

दरेकरांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये दाखवली आहे. तसंच विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार रुपयांचे मानधनही मिळतं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक -

मुंबई : प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मुंबई बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला आहे यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच बँकेवरती अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी आता देखील मजूर संस्थेमार्फत मुबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे मात्र त्यांच्या या अर्जावरती सहकार विभागाने आक्षेप घेतला आहे.

हे देखील पहा -

तसंच या प्रकरणी दरेकरांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे या नोटिशीत त्यांना विचारण्यात आलं आहे की 'आपण मजूर आहात की नाही'...

दरम्यान प्रवीण दरेकरांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये दाखवली आहे. आणि दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार रुपयांचे मानधनही मिळतं असल्याने दरेकर प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नाही असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मजूर संस्थेच्या नियमांनुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे याबाबत प्रविण दरेकर यांना 21 डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन म्हणणे मांडण्याबाबत सांगितल्याचही नोटीसीत नमूद केलेलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

नीट पेपरफुटीनंतर निकालात घोळ, विद्यार्थी, पालकांचा संताप, NTAवर गंभीर आरोप

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! बड्या नेत्यानं केली नव्या पक्षाची घोषणा; थेट बारामतीतून फुंकले रणशिंग

कल्याण जेलमध्ये थरकाप! कैद्याला पोलिसांकडून बेदम मारहाण; पायाला 16 टाके

SCROLL FOR NEXT