Chandrakant Patil In Pune Half Marathon 2022 Saam TV
मुंबई/पुणे

Pune Half Marathon: ...असा इव्हेंट होतो तेव्हा अधिक लोकं धावतात! पुणे हाल्फ मॅरेथॉनचं चंद्रकात पाटील यांच्याकडून कौतुक

Sakal Media Group And Bajaj Allianz Pune Half Marathon 2022: कोरोनामुळे दोन वर्षांचा खंड पडल्यामुळे यावेळी आयोजकांनी पुणे हाल्फ मॅरेथॉनची जय्यत तयारी केली होती.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

पुणे : पुणेकरांची 'सकाळ' आज दमदार होती. पुणेकरांनी आज, रविवारचा सुट्टीचा दिवस फिटनेससाठी समर्पित केला. सकाळ माध्यम समूहाद्वरे आयोजित करण्यात आलेल्या बजाज अलियान्झ पुणे हाल्फ मॅरेथॉन स्पर्धेत पुणेकर मनसोक्त धावले. आज रविवारी म्हणजे २७ नोव्हेंबर २०२२ ला पुणे हाल्फ मॅरेथान स्पर्धेत हजारो पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या मॅरेथॉनमध्ये पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी झाले. भल्या पहाटे सुरू झालेल्या या मॅरेथॉनचं पालकमंत्र्यांनी कौतुक केलं. "वैयक्तिकरीत्या स्वतःच्या प्रेरणेने लोकं धावतात ही संख्या मर्यादित राहते. पण, असा इव्हेंट होतो तेव्हा अधिक लोकं धावतात" असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच "आपल्यालाही धावता आलं असतं तर बरं झालं असतं" असं म्हणत त्यांनी पुणे हाल्फ मॅरेथॉनचं कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Pune Latest News)

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यावेळी म्हणाले की, आपल्यालाही धावता आलं असतं तर बरं झालं असतं. आरोग्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. पण, अशाप्रकारचे वैयक्तिक प्रयत्न करण्यासोबच लोकांनी एकूणच पुण्यातलं पर्यावरण नीट राहिली असेही प्रयत्न करायला हवेत. वैयक्तिक कितीही झाले तरी हवा ज्याप्रकारे प्रदूषित होत चालली आहे, आणि होत राहिली तर त्याचा काही फायदा होणार नाही. मी सकाळ माध्यम समूहाचं (Sakal Media Group) अभिनंदन करतो, खूप शुभेच्छा देतो.

अशाप्रकारचे इव्हेंट (Pune Half Marathon) कुणीतरी आयोजित केल्याशिवाय, जेव्हा कुणीतरी वैयक्तिकरीत्या स्वतःच्या प्रेरणेने लोकं धावतात ही संख्या मर्यादित राहते. पण, असा इव्हेंट होतो तेव्हा अधिक लोकं धावतात. गेल्या दोन स्पर्धांमध्ये तो रेकॉर्ड अधिक होता. कोव्हिडमुळे तब्येतची आणि ऑक्सिजनची आवश्यकता लोकांना कळलेली आहे.

जेव्हा वैयक्तिक व्यायाम, वैयक्तिक चालणं, धावणं, वैयक्तिक योगा हे कसं वाढवलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून पुण्यातल्या हवेचं प्रदूषण, फटाक्यांचं प्रदूषण याचाही नीट विचार केला पाहिजे असंही पाटील म्हणाले.

पुणे हाल्फ मॅरेथॉन स्पर्धेचा पहिला अध्याय २०१८ मध्ये पार पडला. त्यानंतर २०१९ मध्ये दुसरी स्पर्धा झाली. कोरोनामुळे (Corona) दोन वर्षांचा खंड पडल्यामुळे या वेळी संयोजकांनी जय्यत तयारी केली होती. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियमवर पहाटे ५.१५ वाजता राष्ट्रगीत झाल्यानंतर २१ km साठीचे मॅरेथॉन सूरू झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT