पुणे : सकाळ माध्यम समूह आयोजित बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी (ता. २७) होत असून यासाठी हजारो धावपटू सज्ज झाले आहेत. स्पर्धेचा पहिला अध्याय २०१८ मध्ये पार पडला. त्यानंतर २०१९ मध्ये दुसरी स्पर्धा झाली. कोरोनामुळे (Corona) दोन वर्षांचा खंड पडल्यामुळे या वेळी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियमवर पहाटे ५.१५ वाजता राष्ट्रगीत झाल्यानंतर २१ km साठी चे मॅरेथॉन सूरू झाले.
या स्पर्धेत केवळ भारतीय धावपटूंनाच बक्षिसे दिली जातात. या वेळी राष्ट्रीय विक्रमासाठी पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी पाच लाख रुपयांचे खास बक्षीस ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा भारतीय धावपटूंसाठी व्यासपीठ आहे. त्याच धर्तीवर तंदुरुस्तीचा संदेश देणारे आणि त्यासाठी मोफत प्रशिक्षणाद्वारे सामान्य नागरिकांना प्रत्यक्ष कृतीसाठी प्रेरित करणारे व्यासपीठही आहे. पोलिस कमिशनर कप असलेली ही एकमेव स्पर्धा असून त्यात सांघिक स्वरूपात पोलिसांचा सहभाग असतो. याशिवाय कॉर्पोरेट कपलासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
स्पर्धेचा पहिला अध्याय २०१८ मध्ये पार पडला. त्यानंतर २०१९ मध्ये दुसरी स्पर्धा झाली. कोरोनामुळे दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर या वेळी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. यंदा मुख्य स्टेडियमवर प्रारंभ आणि सांगता होणार आहे. त्या वेळी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी हजारो पुणेकर उपस्थित राहतील. त्यासाठी मुख्य स्टेडियम सुसज्ज करण्यात आले आहे. स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांची सफाई आणि सुशोभीकरण पार पडले आहे. धावपटूंसाठी ठिकठिकाणी संयोजकांनी ढोल-ताशा पथकांची व्यवस्था केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.