Tomato Video Saam Tv
मुंबई/पुणे

Tomato Video: तुम्ही खाताय सडलेले टोमॅटो? APMC मार्केटमधील VIDEO होतोय व्हायरल

APMC Market Tomato Viral Video: सध्या सोशल मीडियावर टोमॅटोचा एक व्हिडिओ व्हायरल होतो. सडलेले टोमॅटो निवडून मार्केटमध्ये विकत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Siddhi Hande

आशिया खंडातील सर्वात मोठ्या घाऊक बाजारपेठेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कचऱ्यातील सडके टोमॅटो पुन्हा बाजारात आणून विकले जात आहे. हा घाणेरडा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

राज्यभरात सुरु असलेल्या पावसामुळे खराब झालेला टोमॅटो बाजारात फेकण्यात आला होता. मात्र, एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्ही च्या कॅमेरात कैद झाले आहेत.गोळा केलेले हे टोमॅटो नंतर किरकोळ बाजारात स्वस्तात विकले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या सडलेल्या टॉमेटोंमुळे सामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या प्रकाराकडे बाजार समिती आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.सडलेले, नाशवंत टोमॅटो आणि भाजीपाला पुन्हा गोळा करून विक्रीस पाठवणे ही आरोग्यदृष्ट्या अत्यंत धोकादायक बाब आहे.

ग्राहकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. विशेषतः अतिशय स्वस्त दरात विकल्या जाणाऱ्या भाजीपाल्याबाबत अधिक सावध राहा. तुम्ही घेत असलेल्या भाज्या या चांगल्या आहेत की नाही नक्की चेक करा. त्यानंतरच खरेदी करा. बाजार प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे.

सध्या पावसाळा सुरु झाला आहे. मे महिन्यातच मुसळधार पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्याचसोबत मार्केटमधील भाज्यादेखील खराब झाल्या आहेत. त्यात आता कचऱ्यातील भाज्या मार्केटमध्ये विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT