Dhanshri Shintre
काही भाज्या शिजवण्याऐवजी कच्च्या खाल्ल्यास त्यातील पोषणमूल्य अधिक टिकते आणि आरोग्याला अधिक फायदे होतात.
भाज्या शिजवल्याने त्यातील व्हिटॅमिन सी, फोलेट व एंजाइम्ससारखे महत्त्वाचे पोषक घटक कमी होण्याची शक्यता असते.
आता पाहूया कोणत्या भाज्या कच्च्या खाल्ल्याने आरोग्यास अधिक फायदा होतो आणि पोषक घटक टिकून राहतात.
गाजरांमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि पाचक एंजाइम्स असतात, जे शिजवल्याने कमी होतात, त्यामुळे कच्च्या सॅलडमध्ये खाणे अधिक फायदेशीर आहे.
काकडीमध्ये ९०% पेक्षा जास्त पाणी असते, शिजवल्याने पाणी आणि व्हिटॅमिन सी नष्ट होतो, त्यामुळे काकडी नेहमी कच्ची खावी.
कच्च्या ब्रोकोलीत सल्फोराफेन नावाचे संयुग असते, जे कर्करोगासारख्या आजारांशी लढण्यास मदत करते; शिजवल्यावर ते नष्ट होते.
कच्च्या पालकात फोलेट अधिक असते, पण शिजवल्याने ते नष्ट होते. पालक सॅलड किंवा स्मूदीमध्ये खाल्ल्यास जीवनसत्त्वे टिकून राहतात.
शिमला मिरची लाल, पिवळ्या आणि नारिंगी रंगांमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी व अँटीऑक्सिडंट्स असतात, जे उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात.