Dhanshri Shintre
पावसाळी संध्याकाळी हलका नाश्ता केवळ भूक भागवतोच नाही, तर तात्काळ ऊर्जा देण्याचे कामही करतो.
अशावेळी बाहेर पाऊस पडताना मस्त अशी घरी बनवा कुरमुऱ्यांची ओली भेळ.
कुरमुरे, फरसाण, शेव, कांदा, टोमॅटो, दोन चटण्या, शेंगदाणे, मीठ आणि चाट मसाला यांचे चविष्ट मिश्रण तयार करा.
कुरमुरे निवडून स्वच्छ करा, एका बाउलमध्ये घालून त्यात फरसाण मिसळा आणि चांगले एकत्र करा.
चिरलेला कांदा, टोमॅटो आणि ताजी कोथिंबीर मिश्रणात घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.
चाट मसाला, मीठ, हिरवी चटणी व आंबटगोड चिंच-गूळ चटणी घालून सर्व मिश्रण छानपैकी हलवून मिक्स करा.
भेळ सर्व्हिंग प्लेटमध्ये काढा आणि वरून थोडा कांदा, टोमॅटो व कोथिंबीर घालून सजवा.
वरून कोथिंबीर, खारे शेंगदाणे आणि शेव भुरभुरवा, चवदार ओली भेळ ताजी आणि गरम गरम सर्व्ह करा.