Dhanshri Shintre
जर दररोजचे बेसन-रवा चिल्ले खाऊन कंटाळा आला असेल, तर काहीतरी वेगळं आणि चवदार नक्की करून बघा.
आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणाऱ्या, पौष्टिक आणि चविष्ट अशा परिपूर्ण कॉर्न चिल्लाची रेसिपी सांगणार आहोत. नाश्त्यासाठी एकदम योग्य पर्याय.
कॉर्न चिल्ला तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांत मक्याचे दाणे, कांदा, बेसन, हळद, आले, मीठ, गरम मसाला, हिरवी मिरची आणि थोडं तेल यांचा समावेश आहे.
कॉर्न चिल्ला तयार करताना सर्वप्रथम मक्याचे दाणे मिक्सरमध्ये घालून त्याची मऊसर पेस्ट तयार करून घ्या.
पेस्ट एका भांड्यात घेऊन त्यात बेसन, चिरलेला कांदा, आले, मसाले, मीठ आणि हिरवी मिरची एकत्र करा.
मिश्रणात थोडंसं पाणी घालून नीट मिसळा. नंतर गरम तव्यावर तेल टाका आणि सर्व बाजूंनी पसरवा.
तयार पीठ तव्यावर ओता, हलक्या हाताने गोलसर पसरवा आणि दोन्ही बाजूंनी मंद आचेवर खरपूस भाजून घ्या.
चिल्ला दोन्ही बाजूंनी खरपूस भाजल्यावर प्लेटमध्ये काढा, चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करा आणि स्वाद घ्या.