Corn Cutlet Recipe: तुमच्या दिवसाची सुरुवात करा क्रिस्पी कॉर्न कटलेटने, सोपी आणि पौष्टिक नाश्ता रेसिपी

Dhanshri Shintre

क्रिस्पी कॉर्न कटलेट

मक्याच्या दाण्यापासून भेळ, चाट तुम्ही खात असाल, पण क्रिस्पी कॉर्न कटलेट नाश्त्यासाठी अजून ट्राय केला नाही तर नक्की करा.

साहित्य

स्वीट कॉर्नचे दाणे, उकडलेले बटाटे, लाल तिखट, हिरव्या मिरच्या, आल्याची पेस्ट, मीठ, गरम मसाला, कोथिंबीर, ब्रेडक्रंब, तेल.

बटाटे धुऊन घ्या

सुरुवातीला दोन बटाटे स्वच्छ धुऊन घ्या, त्याचे पातळ स्लाइस करा आणि उकळत्या पाण्यात शिजवा.

मॅश करा

बटाटे उकडून मऊसर मॅश करून घ्या आणि कॉर्नही चांगले शिजवून त्याचा वेगळा वापरासाठी तयार ठेवा.

मसाले घाला

स्वीट कॉर्न, लाल तिखट, हिरव्या मिरच्या, आलं पेस्ट, मीठ, गरम मसाला आणि कोथिंबीर मिक्स करून मिश्रण तयार करा.

ब्रेडक्रंब लावा

१/४ कप ब्रेडक्रंब किंवा पोहे पावडर घालून सर्व मिश्रण एकजीव करा आणि चव पाहून हवे असल्यास मीठ-मसाले वाढवा.

गोळे बनवा

तयार मिश्रणाचे सारखे गोळे बनवा आणि प्रत्येक गोळ्याला हलकं दाबून पेटीससारखा चपट्या आकारात रूप द्या.

कुरकुरीत तळा

एक बाजू नीट तळल्यानंतर पॅटीज उलटवा आणि दुसरी बाजूही सोनेरी व खरपूस होईपर्यंत तळून घ्या.

सर्व्ह करा

स्वीट कॉर्न कटलेट्स हिरव्या चटणी, टोमॅटो सॉस किंवा आवडत्या चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करा.

NEXT: नाश्त्यासाठी हवेय काही झटपट आणि हेल्दी? मग ब्रेकफास्टसाठी ट्राय करा पालक ऑमलेट रेसिपी

येथे क्लिक करा