Arrested
Arrested Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking: टेरर फंडिंग कनेक्शन: पुण्यातून तरुणाला अटक, ATS ची मोठी कारवाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: अतिरेकी संघटनाना अर्थपुरवठा (टेरर फंडिंग) करण्याच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी येथून एका तरुणाला सोमवारी अटक केली. त्यास मंगळवारी दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे."लष्कर ए तैयाबा" या संघटनेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जुनेद मोहम्मद असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद हा समाजमध्यमाद्वारे काश्मीरमधील "गझवाते अल हिंद" या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. एक महिन्यापूर्वी त्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते. दरम्यान, तो या संघटनेच्या अधिक संपर्कात येत असल्याची माहिती पुणे "एटीएस"ला मिळाली होती. त्यानुसार, सोमवारी दुपारपासून त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर तो चौकशीत दोषी आढळल्याने त्याच्याविरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. मोहम्मद यास मंगळवारी दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे.मोहम्मद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे. तो मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. त्याचे शिक्षण मदरशात झालेलं आहे.

त्या स्फोटककांशी संबंध आहे का, याची तपासणी

पुणे स्टेशन येथे मागील आठवड्यात स्फोटके आढळली होती. त्यानंतर रेल्वे, पुणे पोलिस, एटीएस सह सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे, त्यातच एटीएसने दापोडी येथे केलेल्या कारवाईत अटक केलेल्या आरोपीचा या प्रकरणाशी संबंध होता का ? तसेच त्यास पुण्यात काही घातपाती कृत्य करायचे होते का ? याचा तपास एटीएस करत आहे.

हे देखील पाहा-

पुण्यातून यापूर्वीही "टेरर फंडिंग" प्रकरणी झाली होती एकास अटक;

भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून येणारा पैसा (टेरर फंडिंग) भारताच्या वेगवेगळ्या भागात पोचविणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीप्रमुख रमेश शहा (वय 28, रा.गोपालगंज, बिहार) यास महाराष्ट्र व उत्तर प्रदेश "एटीएस'ने फेब्रुवारी २०१९ मध्ये पुण्यातून अटक केली होती. पोलिसांच्या भीतीने त्याने उत्तर प्रदेशमधून पलायन करून पुण्यात वास्तव्य केले होते. तो नेटकॉलींगद्वारे दहशतवाद्यांच्या हॅंडलरशी संपर्कात होता. त्यांच्याकडून मिळणारे पैसे तो देशातील विविध राज्यात दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी पोचवीत होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाबो, अधिकारी महिलेकडं घबाडच सापडलं! मुंबई एअरपोर्टवर 25 किलो सोनं जप्त | Mumbai Airport

AC Tips and Tricks : उन्हाळ्यात AC ऑन करण्याआधी 'या' गोष्टी करा; अन्यथा तुम्हालाही लाईट बिल जास्त येईल

Abhijit Bichukale EXCLUSIVE: कल्याण लोकसभा मतदारसंघच का? अभिजित बिचुकले यांचं उत्तर ऐकण्यासारखंय!

Anuj Thapar : अनुज थापरचा शवविच्छेदन अहवाल आला समोर, कुटुंबीयांनी केली सीबीआय चौकशीची मागणी, नेमकं कारण काय ?

Onion Export News Today: 550 रुपये प्रतिमॅट्रिक टन शुल्क! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT