Mumbai Crime Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत अँटी नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई; 8 कोटींचं ड्रग जप्त, दोघांना अटक

Crime News : केटामाईन नावाचं १५.७४३ किलो ड्रग पोलिसांनी जप्त केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

मुंबई : मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील पारसी पंचायत रोड परिसरातील सोना इंडस्ट्रियल परिसरात अॅन्टी नार्कोटिक्स विभागानं मोठी कारवाई केली आहे. या परिसरातून जवळपास 8 कोटींचं ड्रग पोलिसांनी जप्त केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

केटामाईन नावाचं १५.७४३ किलो ड्रग पोलिसांनी जप्त केलं आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ७ कोटी ८७ लाख १५ हजार इतकी असल्याचं बोलले जात आहे. तसेच ५८,३१,५०० किंमतीच्या प्रतिबंधीत गोळ्या (२३,४१० स्ट्रीप्स) देखील जप्त केल्या आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बार्शी रोड पंचायत परिसरातील सोना इंडस्ट्रियल भागात एका गोडाऊनमध्ये ड्रग्स व बंदी असलेली औषधे साठवण्यात आली होती. याबाबतची गुप्त माहिती अँटी नार्कोटिक्स सेलला प्राप्त झाली होती.

या माहितीच्या आधारावरच पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना केटामाईन आणि बंदी असलेल्या गोळ्या बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले. त्या दोघांविरोधात कलम ८(क), २२ (क), २९ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ सह कलम १८ (क) औषधे व सौंदर्य प्रसादने अधिनियमनुसार जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT