Mumbai Metro Antakshari Video
Mumbai Metro Antakshari Video Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Metro : प्रवास असावा तर असा! मुंबईच्या मेट्रोत रंगल्या गाण्यांच्या भेंड्या, पाहा Video

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: शिफ्ट संपल्यानंतर घरी जाण्यासाठी मुंबईकर लोकल, बस, मेट्राने (Mumbai Metro) प्रवास करत घरी पोहोचतात. प्रवास करताना लोकलमध्ये तौबा गर्दी असते तरिही लोकलमध्ये काही प्रवाशांचा गट भजन करत असतो, मुंबईकरांना याचा चांगला अनुभव आहेच. आता मुंबईच्या मेट्रो ट्रेनमध्येही प्रवासी स्वतःची करमणूक करवून घेण्यासाठी अंताक्षरी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Antakshari In Mumbai Metro)

हे देखील पाहा -

अंताक्षरी हा एक सुरेल आणि तेवढाच गंमतीशीर खेळ असतो. कुठेही आणि कोणत्याही साधनांशिवाय खेळता येईल असा हा अंताक्षरीचा खेळ खेळताना मनही प्रसन्न होतं. मुंबईच्या एका मेट्रोमधील असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतोय. ज्यात काही महिला प्रवाशांचा एक ग्रुप आणि पुरुषांचा एक ग्रुप मेट्रोमध्येच अंताक्षरी खेळातात. एकमेकांसोबत सुरेली स्पर्धा आणि जुगलबंदी करताना दोन्ही बाजूचे प्रवाशी फार आनंदी दिसतायत. मेट्रोमधील अंताक्षरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकवेळी पैसाच हवा असं नसतं, कधीतरी प्रवासातल्या अशा अंताक्षरीतूनही आनंद घेता येतो याचं स्पष्ट उदाहरण या व्हिडिओत दिसतंय. दररोजचा कामाचा ताण, ऑफिमधील टार्गेटचं टेंशन, मनोरंजनासाठी वेळेचा अभाव असं आयुष्य सध्या अनेक मुंबईकरांचं झालंय. पण जर प्रवासादरम्यान अशाप्रकारे अंताक्षरी, भजन, गाणी यांमुळे मन काही प्रमाणात सुखावणार असेल तर असा आनंद घ्यायला काय हरकत आहे?

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून एका कुटुंबाला मारहाण? सुजय विखेंचा आरोप; नगरमध्ये राजकारण तापलं!

Today's Marathi News Live : दादर रेल्वे स्थानकातील अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग

Onion Export News: मोठी बातमी! कांद्यावरील निर्यात बंदी हटवली; निवडणुकीच्या धामधुमीत केंद्राचा मोठा निर्णय

Bacchu Kadu : देशात पक्षांचा राजकीय आतंकवाद वाढत चालला आहे : बच्चू कडू

Petrol Diesel Rate 4rd May 2024: वीकेंडला घराबाहेर पडताय? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर

SCROLL FOR NEXT