संतापजनक! ऑनलाईन क्लासमध्ये अज्ञात व्यक्तीकडून अश्लील कृत्य... Saam Tv News
मुंबई/पुणे

संतापजनक! ऑनलाईन क्लासमध्ये अज्ञात व्यक्तीकडून अश्लील कृत्य...

एका नामांकित महाविद्यालयाचे ऑनलाईन क्लास सुरू असताना मध्येच अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मजकूर आणि कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या शाहूनगर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाचे ऑनलाईन क्लास सुरू असताना मध्येच अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मजकूर आणि कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. महाविदयालयाकडून इयत्ता ९ वी चा क्लास सुरू असताना हा प्रकार घडला आहे. (Annoying! An obscene act by an unknown person in an online class ...)

हे देखील पहा -

अल्पवयीन मुलांना दिलेल्या झूम आयडीद्वारे आरोपींनी प्रवेश करून हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून हे महाविद्यालय ऑनलाइन वर्ग घेत आहेत. दरम्यान काल एका अज्ञात युवकानं ऑनलाईन क्लासच्या यंत्रणेत सहभागी होऊन हे खोडसाळ कृत्य केलं आहे. या प्रकरणी शाहूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून जगभरातील शिक्षण क्षेत्र पूर्णपणे कोलमडून गेलं आहे.

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून देशात अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडून ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब केला जात आहे. मात्र अशा घटना वारंवार होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त

Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; चव्हाणांकडून बालेकिल्ल्याला खिंडार, VIDEO

Shocking: सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, नव्या घरात घेतला गळफास; १० पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण...

Vladimir Putin: परम बलशाली पुतीनची महिला ब्रिगेड, रशियातील 10 शक्तीशाली महिला

MahaYuti Face Clash: महायुतीत वाहताहेत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

SCROLL FOR NEXT