Anil Parab
Anil Parab saam TV
मुंबई/पुणे

Exclusive: शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्याऱ्या ST कर्मचाऱ्यांबाबत अनिल परबांचे मोठं वक्तव्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : ST कर्मचाऱ्यांनी (ST Employee) 22 तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाचे आहेत. 22 तारखेपर्यंत जे कामगार रुजू होतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरातील आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले त्यांना सेवेत घेता येणे शक्य नसल्याचं मोठं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केलं आहे.

22 तारखे पर्यंत कामगार कामावर आले नाही तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का याचा विचार केला जाईल असही ते म्हणाले. 5 महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस अगाराने पूर्ण बसची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ (ST Corporation) बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण पणे सज्ज आहे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या घरासमोर काही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. आता प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. तसंच एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्या प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावरती हजर रहावं त्यांच्यावरती कोणतीही कारवाई करणार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, शरद पवारांच्या घरावरती हल्ला केल्या प्रकरणी ज्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे त्यांना पुन्हा सेवेत घेण अशक्य असल्याचं वक्तव्य परब यांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : महाडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश

Pankaja Munde News: मुस्लिमांच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही माझी गॅरंटी; पंकजा मुंडे कडाडल्या

Curry Leaves: सकाळी खा कढीपत्ता अन् आरोग्याच्या समस्या करा दूर

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला! कोकणासह मराठवाड्यात उष्णतेची लाट, 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT