Anil Parab Resort scam case News, Kirit Somaiya news in Marathi Saam Tv
मुंबई/पुणे

विभास साठे यांचा 'मनसुख हिरेन' होऊ नये; किरीट सोमय्यांचं पोलीस महासंचालकांना पत्र

Anil Parab Resort scam case : याबाबत त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिल विभास साठे यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते मंत्री अनिल परब (Anil Parab) हे यांची सध्या रिसॉर्ट घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. हा रिसॉर्ट ज्या जमिनीवर आहे ती जमीन विभास साठे यांची असल्याचं बोललं जातयं. अशात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याप्रकरणात उडी घेत विभास साठे यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिल विभास साठे यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. (Anil Parab Resort scam case Kirit Somaiya's letter to the Director General of Police)

हे देखील पाहा -

भाजप नेते किरीट सोमय्यांनी ट्वीट केलं की, "मंत्री अनिल परब रिसॉर्ट घोटाळाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती याबाबत त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिल विभास साठे यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. "विभास साठे यांचे "मनसुख हिरण" होऊ नये" विभास साठे यांच्या जिवाला धोका लक्षात ठेऊन त्यांचा सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी विनंती मी महासंचालक यांना केली आहे."

मंत्री अनिल परबांवर ईडीच्या ७ धाडी

२६ मे ला मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी सकाळी ७ वाजता ईडीने धाड टाकली होती. अनिल परब यांच्या खासगी निवासस्थान, शासकीय निवासस्थानासह पुणे, दापोली आणि मुंबई अशी एकुण ७ ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. यात जवळपास ४ अधिकाऱ्यांकडून ही कारवाई केली गेली होती.

काय आहे अनिल परबांचे साई रिसॉर्ट प्रकरण?

पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ ला रत्नागिरीच्या दापोली येथील साई रिसॉर्ट एन एक्स आणि सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.

किरीट सोमय्यांनी केली होती तक्रार

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार दाखल केली होती. सोमय्या म्हणाले की, "बेनामी मालमत्ता, मनी लाँड्रिंग, शेल कंपन्या, पर्यावरण मंत्रालय, FEMA उल्लंघनासाठी ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे असं सोमय्या म्हणाले. तसेच अनिल परब, यशवंत जाधव, हसन मुश्रीफ, कंपनी, मंत्रालय ROC यांची आयकर विभाग, पर्यावरण मंत्रालय, ED, FEMA द्वारा चौकशी करुन कारवाई केली जावी असंही सोमय्या म्हणाले आहेत. यशवंत जाधव यांच्या दुबई कनेक्शनचीही ईडीने चौकशी केली अशी माहिती सोमय्यांनी दिली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : नोटांचे स्क्रॅप भरून जाणाऱ्या ट्रकला आग; कांढळी ते बरबडी रस्त्यावरील घटना

Success Story: कधी-काळी एका खोलीत राहून काढले दिवस, आज आहेत शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पाहा काय आहे त्यांचा बिझनेस?

Maharashtra Politics: क्लिनिक चालवणाऱ्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी कुठून आली? शिंदेंच्या आमदाराला सुषमा अंधारेंचा सवाल

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचा जतमध्ये भाजपला पाठिंबा!

Girish Mahajan : कोपरगावमध्ये काळे- कोल्हेंचा वाद मिटणार, लवकरच एकाच मंचावर दिसतील; मंत्री गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT