Anil Deshmukh : 'जेव्हा मनी लॉंड्रिंग प्रकरणाची सुनावणी असते तेव्हा देशमुख कुटुंबियांवर रेड टाकली जाते' Saam TV
मुंबई/पुणे

Anil Deshmukh : 'जेव्हा मनी लॉंड्रिंग प्रकरणाची सुनावणी असते तेव्हा देशमुख कुटुंबियांवर रेड टाकली जाते'

'21 एप्रिल 2021 ला पहिल्यांदा सीबीआयने FIR नोंदवला असून, महाराष्ट्राचा तत्कालीन गृहमंत्री आहे म्हणून मला अडकवलं जात आहे.'

सुरज सावंत

मुंबई : मनी लॉंड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी देशमुखांचे वकील विक्रम चौधरींनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, '21 एप्रिल 2021 ला पहिल्यांदा सीबीआयने FIR नोंदवला आहे. अनिल देशमुख महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री म्हणून मला अडकवले जात असल्याचं ते यावेळी म्हणाले.

दरम्यान सीबीआयने आज सुनावीदरम्यान अर्ज दाखल केला असून CBI ने संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी अर्ज केला असून कोर्टाने यासाठी सहमती देत 16 आणि 17 फेब्रुवारीला स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी परवानगी दिली आहे.

ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी अनिल देशमुख यांच्या वतीने युक्तीवाद करीत असताना ते म्हणाले, 'अनिल देशमुख यांचे वय 73 आहे , त्यांना काही शारीरिक व्याधी आहे.3 महिन्यांहून अधिक काळ तुरुगांत आजारी आहे म्हणून जामीन मागत नसल्याचही त्यांनी सांगितलं.

दरम्यान या प्रकरणात शिक्षा झाली तर 7 वर्षांची जास्तीत जास्त परमबीर सिंग आणि सचिन वाझे (Parambir Singh and Sachin Waze) यांच्या वक्तव्यावर केस आधारलेली आहे. एक निरीक्षण असे ही आहे की ह्या प्रकरणात जेव्हा सुनावणी होते त्या आधी देशमुख कुटुंबियांवर रेड टाकली जाते. आत्तापर्यंत14 वेगवेगळ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणानी आता पर्यंत 70 वेळा छापेमारी केली आहे. 21 एप्रिल 2021 ला पहिल्यांदा सीबीआयने FIR नोंदवला असून ते महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री म्हणून मला अडकवले जात असल्याचंही अनिल देशमुखांच्या वकिलांमार्फत सांगण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora: मलाइकाचा फोटो वापरून पिंपरीत अनधिकृत जाहिरात; पालिकाने केली मोठी कारवाई

Kalyan News : नगर-पुण्यानंतर कल्याणमध्ये बिबट्याची दहशत, कुत्रे-जनावारांवर हल्ला, नागरिकांसमोर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Live News Update : तलवारीचा व बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले

Kajol: लग्नाचीही एक्सपायरी डेट असली पाहिजे...; काजोलच्या वक्तव्यावर नेटकरी चिडले; म्हणाले, त्याला घटस्फोट...

Indurikar Maharaj Name History: इंदुरीकर महाराजांना 'इंदुरीकर' हे नाव कसं पडलं?

SCROLL FOR NEXT