Anil Deshmukh यांना लूकआऊट नोटीस जारी, वाचा सविस्तर
Anil Deshmukh यांना लूकआऊट नोटीस जारी, वाचा सविस्तर Saam Tv news
मुंबई/पुणे

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सुनावण्यात आलेली कोठडी आज संपली होती. त्यामुळे आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या सुनावणीत, ईडीच्या वकिलांनी अनिल देशमुख यांना आणखी तीन दिवस कोठडी देण्याची यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद सुरु होता. त्यानंतर न्यायालयाने अनिल देशमुख यांना तीन दिवसांची ईडी कोठडी ED Custody To Anil Deshmuk म्हणजेच, 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. देशमुखांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी फेटाळली आहे.

अनिल देशमुख हे 1 नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले होते. त्यावेळेस त्यांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली होती. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि वसुलीच्या आरोपानंतर सीबीआयने CBI त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिंगच्या प्रकारणांतर्गत गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती ती आज संपली होती. त्यामुळे आता पुन्हा, मुंबई उच्च न्यायालयाने आज देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती.

ऋषिकेश देशमुख यांना आजही दिलासा नाहीच;

ऋषिकेश यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी 20 नोव्हेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. ह्या प्रकरणात पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला होणार आहे. ऋषिकेश माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पुत्र आहेत. मनी लांड्रिंग प्रकरणी ऋषिकेश यांनी ईडी तर्फे समन्स देण्यात आले होते. मात्र ऋषिकेश तर्फे सेशन कोर्टात अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला आहे. त्यामुळे सेशन कोर्टमध्ये 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SCROLL FOR NEXT