Andheri Railway Police hand over a recovered bag containing gold jewellery and a DSLR camera worth ₹10.95 lakh to the rightful commuter. saam tv
मुंबई/पुणे

रेल्वे पोलिसांचं कौतुक करावं तेवढं कमी! १०.९५ लाखांचे दागिने आणि कॅमेरा केला प्रवाशाला परत

Andheri Railway Police Returns Lost Bag Worth 10.95 Lakh: अंधेरी रेल्वे पोलिसांनी चर्चगेट-विरार लोकलमध्ये हरवलेली तब्बल १०.९५ लाखांची बॅग शोधून प्रवाशाला परत केली.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: अंधेरी रेल्वे पोलिसांनी तत्परता आणि प्रामाणिकतेचे उदाहरण दाखवत चर्चगेट-विरार लोकलमध्ये विसरलेली तब्बल १० लाख ९५ हजार रुपये किमतीची बॅग शोधून प्रवाशाला परत केली. या बॅगेत ७ तोळे सोन्याचे दागिने तसेच सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा डीएसएलआर कॅमेरा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोशील/१७४३ खोडे हे २४ मे रोजी रात्री ११.४६ वाजताच्या चर्चगेट-विरार फास्ट लोकलने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांनी आपली बॅग चुकून डब्यातच विसरली. बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला.

अंधेरी रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरपीएफ कंट्रोलला माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे बॅगचा शोध घेण्यात आला. अखेर बॅग सुरक्षित अवस्थेत मिळाली. तपासादरम्यान बॅगेत ७ तोळे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत सुमारे १० लाख ५० हजार रुपये होती, तसेच अंदाजे ४५ हजार रुपये किमतीचा डीएसएलआर कॅमेरा असल्याचे आढळले.

एकूण १० लाख ९५ हजार रुपये किमतीचे मौल्यवान साहित्य संबंधित प्रवाशाला सुखरूप परत करण्यात आले. या कामगिरीबद्दल रेल्वे पोलिसांचे कौतुक होत आहे. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तू आणि सामानाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक नितीन लोंढे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatwave Alert : विदर्भासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! तापमानाचा पारा ५०शी जवळ, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra News Live Update: विधान परिषदेची मागणी शिवसैनिकांनी करण काही चुकीच नाही -भरत गोगावले

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर ईडीची धाड; कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या, राजकारण तापलं

School Bus Fees Hiked : शाळा सुरू होण्याआधीच पालकांना जोरदार धक्का, स्कूल बसच्या दरात २०-२५ टक्क्यांनी वाढ

रायगडमध्ये या ठिकाणी दिसतील दुर्मिळ पाणमांजरं, प्रदूषणाच्या विळख्यातही टिकवले अस्तित्व; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT