Andheri By-Election
Andheri By-Election Saam TV
मुंबई/पुणे

Andheri East Bypoll Result : सातव्या फेरीअखेर नोटांना ४ हजार मतं; ऋतुजा लटके कितीने आघाडीवर? वाचा...

साम टिव्ही ब्युरो

Andheri East Bypoll Result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. रविवारी सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत मतमोजणीच्या एकूण 7 फेऱ्या झाल्या आहेत. यामध्ये शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आघाडीवर आहे. (Andheri East Election Result 2022)

अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri) चर्चेत असलेल्या नोटा फॅक्टरचा प्रभाव निकालावेळी दिसून आला. ऋतुजा लटके यांना आतापर्यंत 32 हजार 998 मते मिळाली आहेत. मात्र, त्यांच्यापाठोपाठ अपक्ष उमेदवारांना मागे टाकून नोटाला 4 हजार 712 मतं मिळाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीची मतमोजणी 1 फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपच्या मुरजी पटेल यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र,मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून 'नोटा'चा प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जात होता.

ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. इतकंच नाही तर सोशल मीडियावर नोटाला ऋतुजा लटके यांच्यापेक्षा जास्त म्हणजे तब्बल 43 हजार मतं पडतील, अशी एक पोस्ट व्हायरल झाली होती. मात्र, ही पोस्ट बनावट असल्याचा दावा ठाकरे गटाने केला होता.

दरम्यान, या पोस्टमधील दाव्याप्रमाणे नोटाला ऋतुजा लटके यांच्यापेक्षा जास्त मतं पडली नसली तरी आतापर्यंत नोटाला जवळपास 5 हजार मतं मिळाली आहे. अजूनही मतमोजणीच्या 12 फेऱ्या बाकी असून अखेरच्या फेरीपर्यंत ऋतुजा लटके किती मतांनी विजयी होतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पुणे येथील Hit And Run प्रकरणातील अल्पवयीन मुलाला 12 तासात जामीन

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

Today's Marathi News Live: नवी मुंबईत या वाहनांना प्रवेश बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Pune Hit and Run Case | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड

SCROLL FOR NEXT