मुंबई : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही अशीच मागणी केली आहे. अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करु नका, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे
निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल. जेणेकरुन महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल. निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराचा कालावधी अवघा दीड वर्ष आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची करु नये. तसेच रमेश लटके यांचं योगदान पाहता निवडणूक बिनविरोध करून ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून आणणे योग्य राहील. यामुळे योग्य संदेश जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं. (Latest Marathi News)
महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून योग्य भूमिका घेत मुंडेच्या कुटुंबातील कुणीही उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका घेतली होती, याची आठवणही शरद पवारांनी करुन दिली.
त्यामुळे राज ठाकरे आणि आता शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाचा भाजप कसा विचार करेल याकडे सर्वाचं लक्ष आहे. मात्र आमचं ठरलं आहे. आमचा उमेदवार जिंकेल, आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे, असं भाजप नेते प्रविण दरेकर यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.