Andheri East Bypoll : भाजपने अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये; राज ठाकरे यांची फडणवीस यांना विनंती

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, अशी विनंती राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
Andheri East Bypoll, Raj Thackeray Devendra Fadnavis /File
Andheri East Bypoll, Raj Thackeray Devendra Fadnavis /FileSAAM TV
Published On

Andheri East Bypoll, Raj Thackeray मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिष्ठेची केलेली असतानाच, एक नवा ट्विस्ट आला आहे. भाजपने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. (Letest Marathi News)

Andheri East Bypoll, Raj Thackeray Devendra Fadnavis /File
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक; ३ नोव्हेंबरला मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची घोषणा झाली. ही निवडणूक शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी होणार अशी अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि ही जागा भाजपला (BJP) मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी देऊन रंगत आणखी वाढवली आहे.

Andheri East Bypoll, Raj Thackeray Devendra Fadnavis /File
Rutuja Latke: ऋतुजा लटके यांच्या प्रचाराला सुरुवात; अंधेरी पोटनिवडणुकीचा प्रचार

ही पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजप अशी थेट होणार असल्याचे निश्चित झाले. मात्र, यात आता नवा ट्विस्ट आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आज, रविवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आलेलं असतानाच, काही तासांतच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे.

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक रंगतदार स्थितीत आली असतानाच, राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे.

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आज अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली होती. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या आमदार झाल्या तर, रमेश यांच्या आत्म्याला शांती मिळेल. भाजपने ही निवडणूक लढवू नये आणि लटके यांच्या पत्नी आमदार होतील हे पाहावं, अशी विनंती आहे, असं राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं केल्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करत असतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं माझं मन सांगतं, असेही राज ठाकरे पत्रात म्हणाले.

असे करणे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे की आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com