Anand Mahindra Saam Tv
मुंबई/पुणे

Anand Mahindra : आनंद महिंद्रा आता उघडणार मेडिकल कॉलेज, ट्विट करुन दिली माहिती

दरवर्षी वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक भारतीय विद्यार्थी रशिया आणि युक्रेनसारख्या देशांमध्ये जातात.

साम वृत्तसंथा

मागिल नऊ दिवसांपासून रशिया- युक्रेन सुरु आहे. या युध्दात युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. भारतासमोर ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहितीही मिळत आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी युक्रेन मध्ये भारतातून जातात.

भारतात प्रवेश मिळत नाही. भारतात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय शिक्षणासाठी खर्च करावा लागतो. म्हणून विद्यार्थी युक्रेनमध्ये जातात.युक्रेनमध्ये भारताचे विद्यार्थी संकटात आहेत. आता यावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबत माहिती दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी भारतात वैद्यकीय कॉलेज सुरु करण्याची गरज समजून ट्विट केलं आहे. ''मला माहित नव्हतं भारतात वैद्यकीय कॉलेज एवढे कमी आहेत. सीपी गुरनानी वैद्यकीय अभ्यासासाठी महिंद्रा विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय संस्था सुरू करू शकतो का?'' अस या ट्विटमध्ये महिंद्रा यांनी म्हटलं आहे. या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सीपी गुरनानी यांना टॅग केले आहे.

दरवर्षी वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक भारतीय विद्यार्थी रशिया आणि युक्रेनसारख्या देशांमध्ये जातात. चीन देखील वैद्यकीय अभ्यासासाठी एक चांगला पर्याय बनला आहे. अनेक छोटे देश आता कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण देत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना वैद्यकशास्त्र करायचे आहे, म्हणून ते एमबीबीएससाठी अभ्यासासाठी अर्मेनिया किंवा मंगोलियासारख्या देशांमध्ये जातात.

मागिल नऊ दिवसांपासून रशिया -युक्रेन युध्द सुरु आहे. मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा' च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशात आणलं जातं आहे.

Edited by- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT