Thane Anand Ashram News Saam tv
मुंबई/पुणे

Anand Ashram : आनंद आश्रमात उधळल्या नोटा, VIDEO आला समोर; केदार दिघे संतापले

Kedar Dighe : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा एक व्हिडिओ केदार दिघे यांनी सोशल मीडियावर शेअर करत संताप केला व्यक्त.

Satish Kengar

ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी हा व्हिडिओ X वर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर केदार दिघे यांनी आनंद आश्रमाचं पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप केला आहे. X वर हा व्हिडिओ पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, ''तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या. दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केल, आमचा आनंद हरपला.''

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर केदार दिघे म्हणाले आहात की, ''आज सकाळपासून आनंद दिघे यांच्या ऑफिसमधला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातच सकाळपासून मला अनेक लोकांनी फोन केले आणि विचारलं की, अशी कोणती प्रथा किंवा परंपरा आहे का, जिथे दिघेसाहेबांच्या आनंद आश्रमात पैसे उधळे जातात. ही खूप निंदनीय आणि दुःखद गोष्ट आहे.''

ते म्हणाले आहेत की, मी लोकांना आणि जनतेला सांगू शकतो की, ज्या आनंद आश्रमात लोकांना न्याय दिला जात होता, त्या ठिकाणी असा प्रकार घडणे चुकीचे आहे. आता आनंद आश्रम.. आनंद आश्रम राहिलेला नाहीये. तर आपला आनंद हरपला आहे, अशी टीका केदार दिघे यांनी केली आहे.

शिंदे गटाने काय दिली प्रतिक्रिया?

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर शिवसेना शिंदे गटाचीही प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के याबद्दल बोलताना म्हणाले आहेत की, ''ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी असलेला एक व्हिडिओ समोर आला आहे. सदरची प्रथा दिघेसाहेबांच्या आश्रमातील आहे. दिघेसाहेब असतानाही गणपती विसर्जनावेळी अशा प्रकारे लहान मुलं ढोल वाजवत त्यांना भेटायला यायचे. त्यावेळी दिघेसाहेब बक्षीस म्हणून त्यांना पैसे द्यायचे. काही लोक त्याचा गैरप्रकार आणि चुकीचा पद्धतीने टीका करत आहेत. ज्याने अशा प्रकारे पैसे दिले त्याच्यावर कारवाई केली आहे. तसेच दिघेसाहेब काय होते, ते दाखविण्याचे काम देखील आम्हीच केलं.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

Diabetes Diet: इडली, डोसा डायबेटिस पेशंटसाठी चांगला की वाईट? सोप्या ब्रेकफास्ट टिप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

SCROLL FOR NEXT