Breaking: ईडीच्या कारवाईवरुन शिवसेना नेते आनंद अडसुळांना न्यायालयाचा दणका Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking: ईडीच्या कारवाईवरुन शिवसेना नेते आनंद अडसुळांना न्यायालयाचा दणका

न्यायालयाने अडसुळांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज सावंत

मुंबई : शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ Former MP Anandrao Adsul यांना ईडीकडून समन्स बजाविण्यात आले होते. सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी City Cooperative Bank Scam आनंदराव अडसूळ यांच्यावर आरोप आहे. आता शिवसेना नेते आनंद अडसूळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने ED च्या कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.

हे देखील पहा-

सिटी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीचं समन्स रद्द करावे अशी याचिका अडसुळानी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. तसेच आपण उपचार घेत असून ईडीच्या चौकशीला हजरराहू शकत नसल्याचे कारणही त्यांनी दिले होते. मात्र ईडीच्या कारवाईला आवाहन देणारी अडसूळांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने अडसुळांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश दिले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण;

'सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, 99 टक्के मराठी लोकांचे खाते होते. त्यामुळे जवळपास 9 हजार खातेधारक Account Holder होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले आणि त्यात अडसूळांनी 20 टक्के कमिशन घेतले यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास 980 कोटींचा घोटाळा झाला. दोन वर्षांपूर्वी एफआयआर FIR झाले आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा Shivsena CM असल्यामुळे ही चौकशी केली नव्हती', असा आरोप आमदार रवी राणा Ravi Rana यांनी केला आहे.

मात्र, कुठल्याही प्रकारची अटक आनंदराव अडसूळ यांना झालेली नाही. ही रवी राणा यांनी पेरलेली माहिती आहे, असेआनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ Abhijit Adsul यांनी म्हटलं आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Raj Thackeray School: राज ठाकरेंचं शिक्षण दादरच्या या शाळेत झालं आहे

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

SCROLL FOR NEXT