Pune Fire  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune IT Company Fire: पुण्यात आयटी कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी

Latest News: अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Priya More

ज्ञानेश्वर चौतलम, पुणे

Pune News: पुण्यामध्ये (Pune) आयटी कंपनीला आग (IT Company Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातल्या विमाननगर भागामध्ये ही घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रसत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या विमाननगर भागातील फिनिक्स मॉलच्या शेजारी असलेल्या एका खासगी आयटी कंपनीला आग लागली आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागली. मार्व्हल एज कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या पार्किंग एरियामध्ये ही आग लागली. काही वेळातच ही आग बिल्डिंगच्या इतर मजल्यावर पसरली. कंपनीला आग लागल्यानंतर 2000 कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सध्या ही आग नियंत्रणात आली असून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.

या आगीचे कारण अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आग लागल्यामुळे विमाननगरच्या या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी चार फायर इंजिन मार्व्हल एज कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये तैनात करण्यात आलेत.

या बिल्डिंगेमध्ये काम करणाऱ्यांनी सांगितले की, आग लागण्यापूर्वी जळणाऱ्या रबराचा तीव्र वास येत होता. चार ते पाच व्यवसाय असलेल्या या बिल्डिंगमध्ये आग लागल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. आगीमुळे कार्यालयीन कामकाजात मोठा परिणाम झाला आहे. यामुळे असंख्य व्यवसाय दिवसभरासाठी बंद करावे लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT