Amruta fadnavis on Ajit pawar Saam tv
मुंबई/पुणे

Amruta Fadnavis on Ajit pawar: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का? अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या

Amruta fadnavis on Ajit pawar: या कार्यक्रमानंतर अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का? यावर अमृता फडणवीस भाष्य केलं आहे.

Dnyaneshwar Choutmal

Amruta Fadnavis News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का? यावर अमृता फडणवीस भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांवरील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का? या पत्रकारांच्या वक्तव्यावर भाष्य करताना अमृता फडणवीस यांनी म्हटले की, 'मला कोणीही मुख्यमंत्री झाले तर आवडेल. महाराष्ट्रासाठी २४ तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल'.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही फडणवीस यांनी भाष्य केलं. 'अजित पवार जर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर तुम्ही यावर काय म्हणाल? यावर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, 'मला वाटतं की, महाराष्ट्र आपला असं राज्य आहे की, जे खूप काही करू शकतो आणि खूप काही करत आहे. यासाठी जो माणूस आपल्या जनतेसाठी जो पक्ष पुढे येतो. त्या पक्षाला न्याय देऊ शकेल असं वाटलं, तर ते चांगलं आहे, तो कोणीही असला तरी चालेल'.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मैत्रीवर अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं. दोघांची मैत्री खूप जवळची आहे का? यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, 'ते त्या दोघांना जास्त माहिती आहे. राजकारणी लोक त्यांची मैत्री असते, अनेकदा डोळे मारतात, खूप ठिकाणी डोळे मारतात'. अमृता फडणवीसांनी मिश्किल उत्तर देत अजित पवारांना टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मकरसंक्रातीला मुंबईत आक्रीत घडलं, पाहुण्यांकडे गेलेल्या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू

Municipal Elections Voting Live updates : पुणे महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

आजचा दिवस अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी उत्तम; पंचांगानुसार कोणाला मिळणार फायदा?

Success Story: जोडीदार असावा तर असा! बॉयफ्रेंडच्या मदतीने स्पर्धा परीक्षा पास; DSP दिव्या झरिया यांचा प्रेरणादायी प्रवास

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

SCROLL FOR NEXT