Amruta fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

उद्वस्थ ठ_ _ ने कुठे...; अमृता फडणवीसांनी पुन्हा ठाकरे सरकारला डिवचलं

अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विटद्वारे ठाकरे सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये काही प्रश्न विचारत सरकारवर निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या समाज माध्यमांवर सतत चर्चेत असतात. आपल्या ट्विटद्वारे त्या राज्य सरकारवर टीकाही करत असतात. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपल्या ट्विटद्वारे ठाकरे सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये काही प्रश्न विचारत सरकारवर निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी थोडक्यात उत्तर द्यावे; असं लिहीत वसूली, लोडशेडींग, (Load Shedding) ट्राफिक वरुन सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये (Tweet) त्यांनी प्रश्न विचारत काही पर्यात दिले आहेत. शिवाय उत्तर दिलेल्या विकल्पांमधूनच एक किंवा सर्व पर्याय निवडून द्यावे, असं लिहीतच आपल्या आधीच्या ट्विटमधील उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा ? या शब्दांचा उल्लेख केला आहे.

१. वसूली च्या ताब्यात

२. विकृत अघाडीच्या ताब्यात

३. लोड shedding च्या ताब्यात

४. Traffic Jam आणि अव्यवस्थेच्या ताब्यात

५. गुंडांच्या ताब्यात

दरम्यान, 'मातोश्री'समोरील हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण प्रकरणातून राणा दाम्पत्यांनी माघार घेतल्यानंतर शिवसैनिकांनी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी मागावी असा आक्रमक पवित्रा घेतला होता. शिवसैनिकांच्या या मागणीवरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?’ असे ट्विट केलं होतं मात्र काही वेळाने त्यांनी ते ट्विट डिलीट केलं होतं, मात्र आता पुन्हा त्यांनी ट्विट करत सरकारला डिवचलं आहे.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खासगी क्लासच्या सहलींसाठी कडक नियमावली करा; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

15 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत निकटवर्गीय सचिन सानप पुणे शिक्षक मतदार संघातून उभे राहणार यावर ठाम.

CJP Shivaji Park Protest: अभिजीत दीपकेंसह 500 जणांविरोधात FIR; शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

महायुतीत मोठी बंडखोरी? पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटेंना अर्ज भरण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना?

SCROLL FOR NEXT