Amrita Fadnavis : महाविकास आघाडी नव्हे; "महा-गोंधळलेलं" सरकार - अमृता फडणवीस Saam TV
मुंबई/पुणे

Amrita Fadnavis : महाविकास आघाडी नव्हे; "महा-गोंधळलेलं" सरकार - अमृता फडणवीस

'दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत निर्णय होणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही. योग्य बैठका होऊन विद्यार्थ्यांचा निर्णय झाला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती.'

दिलीप कांबळे

मावळ : दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न असो किंवा महिला सुरक्षिततेचा प्रश्न असो सरकार सगळ्याच बाबतीत उदासीन आहे. या सरकारला अर्ध्या गोष्टी तर काय सुरू आहेत याबाबत माहितीच नसते. त्यामुळे हे सरकार उदासीन असल्याची टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

लोणावळ्यात सुकन्या योजनेचे (Sukanya Yojana) प्रमाणपत्र देण्यासाठी त्या आल्या होत्या. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत निर्णय होणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही. योग्य बैठका होऊन विद्यार्थ्यांचा निर्णय झाला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती असं त्या यावेळी म्हणाल्या.

तसंत या सरकारने काही विशिष्ठ लोकांच्या फायद्यासाठी किराणा दुकानात वाईन (Wine) विक्रीची परवानगी दिली आहे. हे खूप अयोग्य आहे. प्रत्येक प्रश्नांवर मविआ सरकार उदासीन आहे. महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) नाही तर "महा केओस" सरकार असल्याची टीका यावेळी अमृता फडणवीस यांनी केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार

Maharashtra Politics: राजकीय वाद पेटला! शिंदेंच्या नेत्याच्या घरावर हल्ला, दगडफेक करत कार जाळण्याचा प्रयत्न; पाहा VIDEO

ZP Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, कोर्टातून आली मोठी अपडेट

Winter Alert : राज्यात तापमानात चढ उतार, पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज

दुर्दैवी! भारतीय जवानाचा लेकीच्या जन्माआधीच मृत्यू, पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आला होता सुट्टीवर, सातारा शोकसागरात

SCROLL FOR NEXT