पुणे: मला ना राजकिय वारसा ना राजकिय मतदार संघ, ना राजकिय महत्वकांक्षा..! कमवायचं काही नाही अन गमवायचं हि काही नाही ...! त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी एका राजकिय व्यक्तीची राजकिय आत्महत्या होत असेल तर त्याला माझी तयारी..! असल्याचे स्पष्ट मत शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हेंनी बैलगाडा मालकांच्या बैठकीत ठणकाऊन सांगितले.
बैलगाडा शर्यतबंदी विरोधात राज्यात आंदोलनाचा वनाव फेट घेण्याच्या तयारीत असताना शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हेंनी (DR. Amol Kolhe) बैलगाडा मालकांच्या बैठकीत बैलगाडा शर्यत सुरु व्हावी यासाठी आक्रमक भुमिका घेण्याची तयारी दाखवली आहे. बैलगाडा शर्यत सुरु व्हावी यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बैठकीची परवानगी मागितली आहे. पुढील काळात बैलगाडा शर्यत कायमस्वरुपी सुरु व्हावी आणि यासाठी वाटेल किंमत मोजायची तयारी खासदार कोल्हेंनी बैलगाडा मालकांच्या बैठकीत दर्शवली आहे.
बैलगाडा शर्यत हि आजपर्यत रायकिय स्वर्थासाठी हत्यार म्हणुन वापरली गेली आहे, अशातच मागील काही दिवसांपासुन बैलगाडा मालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता बैलगाडा शर्यत हि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था, ग्रामीण संस्कृती, आणि बैल टिकविण्यासाठी हि लढाई आहे , राजकारण, पक्ष, निवडणुका बाजुला ठेवुन सर्वच राजकिय नेत्यांनी एकत्र येऊन एक क्रांतीची मिसाल हाती घेण्याची हि वेळ आहे.
यासाठी खासदार कोल्हेंनी पुढाकार घेत आता बैलगाडा शर्यत कायमस्वरुपी सुरु करण्याची राजकिय आत्महत्या करण्याची वेळ जरी आली तरी मागे पहाणार नाही असे आश्वासन बैलगाडा मालकांना आजच्या बैठकीत दिले आहे.
बैलगाडा मालकांची ओझर येथे बैठक पार पडली. यावेळी खासदार अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, मावळचे आमदार सुनील शेळके, पुरंदरचा आमदार संजय जगताप, यांच्यासह मोठ्या संख्येने बैलगाडा मालक उपस्थित होते.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.