Amit Thackeray News  Saam tv
मुंबई/पुणे

Amit Thackeray : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? अमित ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य, VIDEO

Amit Thackeray Interview : ठाकरेंबाबत सर्वात मोठी बातमी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येणार याची नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चा रंगते... मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याचा विषय संपलेला आहे असं अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलंय... साम टीव्हीच्या EXCLUSIVE मुलाखतीत अमित ठाकरेंनी हे मोठं विधान केलंय..

Girish Nikam

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं किंवा हे बंधू भविष्यात एकत्र येतील अशी सातत्याने अटकळ बांधली जाते. 2014, 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि शिवसेना व मनसे पक्षाची युती होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, आजतागायत ही युती झालेली नाही. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक हे दोन्ही नेते एकत्र यावेत याकरता आशावादी असतात. मनसेचे माहीम येथील उमेदवार आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी साम टीव्हीच्या EXCLUSIVE मुलाखतीत आता दोन ठाकरे एकत्र येण्याचा विषय संपलेला आहे असं स्पष्टच सांगून टाकलंय.

मनसेचे नेते आणि शिवडीतील उमेदवार बाळा नांदगावकर यांनी अर्ज दाखल करतानाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील असा दावा केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र अमित ठाकरेंच्या विधानानं ही चर्चा शांत होणार आहे. दरम्यान शिंदे गटानं यावर प्रतिक्रीया दिली आहे. कुटुंब फुटू नये म्हणून राज ठाकरेंनी हात पुढे केला होता, मात्र इतरांनी केला की नाही हे माहिती नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.

2006 मध्ये शिवसेनेमध्ये आपल्याला आणि आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 9 मार्च 2006 रोजी मनसे पक्षाची स्थापना केली.2009 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 13 जागा मनसेने जिंकल्या होत्या. मात्र नंतर पक्षाची घसरण झाली.

यंदा लोकसभेला महायुतीला पाठींबा देणारी मनसे विधानसभा निवडणूक मोठ्या ताकदीनं लढणार आहे. ठाकरे गट आणि मनसेत कोण बाजी मारणार हे पाहण महत्वाचं आहे. कारण दोन्ही आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT