'ती' अनधिकृत पोलीस चौकी अखेर पाडणार! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंबरनाथची 'ती' अनधिकृत पोलीस चौकी अखेर पाडणार!

मनसेच्या उपोषणानंतर पालिकेचं लेखी आश्वासन

अजय दुधाणे

अंबरनाथ - शहरातील गोविंद पूल ते लोकनगरी बायपास रोडवर अनधिकृत पोलीस चौकी उभारण्यात आली होती. याविरोधात मनसने उपोषण करताच पालिकेनं ही चौकी पाडण्याचं लेखी आश्वासन दिलं आहे.गोविंद पूल ते लोकनगरी बायपास रस्त्यावर काही दिवसांपासून भररस्त्यात एक बांधकाम सुरू होतं. या बांधकामाची चौकशी केल्यानंतर पोलीस चौकी असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र भररस्त्यात पोलीस चौकी उभारण्याऐवजी रस्त्याच्या दुसऱ्या कडेला पोलीस चौकी उभारण्याची मागणी मनसेनं केली होती.

हे देखील पहा -

मात्र तरीही चौकीचे बांधकाम सुरूच असल्याने मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी या चौकीच्या शेजारीच उपोषण सुरू केलं. याचदरम्यान पालिकेनं पोलिसांकडे चौकशी केलं असता, ही चौकी आमची नसून ती आमच्या सांगण्यानुसार बांधली जात नसल्याचे लेखी पत्र पोलिसांनी पालिकेला दिलं. त्यानंतर पालिकेनं ही चौकी तोडण्याचा निर्णय घेतला. मनसेला याबाबत पालिकेनं लेखी आश्वासन दिलं असून पुढील पाच दिवसात हे बांधकाम पाडणार असल्याचं पालिकेनं सांगितलं आहे.

याबाबतचं पत्र अंबरनाथ पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप कांबळे यांनी मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांना दिलं आहे. दरम्यान, या सगळ्यानंतर पोलीस चौकीच्या नावाखाली हे अनधिकृत बांधकाम कोण करत होतं? याचा शोध पालिकेनं घेणं गरजेचं असून संबंधित भूमाफियावर कारवाई होणं गरजेचं बनलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT