ambernath News  Saam tv
मुंबई/पुणे

Ambernath : लिफ्टमध्ये एकटा दिसला, बिल्डिंगमधील व्यक्तीचा 12 वर्षीय मुलावर हल्ला; हातालाही चावला, अंबरनाथमध्ये खळबळ VIDEO

Ambernath Shocking Incident : लिफ्टमध्ये एकट्या मुलावर इमारतीमधील व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथमधील पालेगाव परिसरातील पटेल झेनॉन या गृहप्रकल्पात राहणाऱ्या १२ वर्षाच्या मुलावर लिफ्टमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकारानंतरही पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. पीडित कुटुंबाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांना दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकरलाल यांचा १२ वर्षांचा मुलगा ४ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता ट्युशनसाठी घरातून निघाला होता. तो इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून लिफ्टने खाली येत असताना लिफ्ट ९ व्या मजल्यावर थांबली. दरवाजासमोर कोणीच नसल्याने त्याने दरवाजा बंद करण्यासाठी बटण दाबले. पण दरवाजा बंद होत असतानाच नवव्या मजल्यावर राहणारा कैलास थावाणी हा लिफ्टमध्ये शिरला आणि लहानग्या त्यागीच्या कानशिलात मारहाण करण्यास सुरुवात केली.

एवढ्यावरच न थांबता, त्याने त्यागीच्या हाताचा चावा घेतला.त्यावेळी लिफ्टमध्ये हाऊस किपिंग करणारी महिला उपस्थित होती. तिने प्रसंगावधान राखत लिफ्ट तळ मजल्यावर थांबवल्यावर मुलाला लिफ्टमधून बाहेर काढले. मात्र लॉबीमध्ये पुन्हा एकदा कैलासने मुलाने हात उचलला. या वेळी सुरक्षारक्षक आणि काही रहिवाशांनी हस्तक्षेप करत त्यागीचा बचाव केला आणि त्याला घरी पाठवले.

या घटनेनंतर त्यागीच्या आईने शिवाजी नगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला, ज्यामुळे पांडे कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्हीत कैद असूनही संबंधित आरोपीवर कठोर कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्येही संतापाची भावना होती. आता या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

Manoj Jarange : ४ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगेंची प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिले महत्त्वाचे अपडेट; VIDEO

Manoj Jarange Protest: कोर्टाचा अल्टिमेटम; आझाद मैदानावर जरांगेंच्या आंदोलनातून हायव्होल्टेज ड्रामा

SCROLL FOR NEXT