Ambernath News Saam Digital
मुंबई/पुणे

Ambernath News : आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा संघर्ष अटळ! शिवसेनेचा इशारा

Ambernath Water Shortage News : अंबरनाथ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असून पाण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने ८ दिवसात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sandeep Gawade

अजय दुधाणे, साम टीव्ही प्रतिनिधी

अंबरनाथ शहरात सुरू असलेला अनियमित पाणीपुरवठा आणि वीजेचा लपंडाव यावर आठ दिवसात तोडगा काढा, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा थेट इशारा अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला आहे. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत आठ दिवसांची मुदत मागीतली आहे. त्यानंतर मात्र या दोन्ही विभागांविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं अरविंद वाळेकर यांनी म्हटलं आहे.

अंबरनाथ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असून पाण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रासले आहेत. याबाबत शिवसेनेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला विचारलं असता त्यांनी, महावितरणकडे बोट दाखवत वीजपुरवठा नियमित नसल्याचं कारण दिलं. त्यामुळेच पाणीपुरवठ्याला फटका बसत असल्याचं कारण दिलं होतं.

त्यामुळे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी या दोन्ही विभागांना आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांची मुदत मागितली असून त्यात वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं आहे. आठ दिवसात ही समस्या मार्गी न लागल्यास संघर्ष अटळ असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली, दिली UPSC परीक्षा, पहिल्या प्रयत्नात IPS; स्वीटी सहरावत यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरूप

एक नंबर! इलेक्ट्रिक टू-व्हीलर मिळेल सब्सिडी; स्वस्तात येईल बाईक, 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

Horoscope: प्रेमाची कळी खुलणार, जवळीक वाढेल; नाराजी होईल दूर

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणार त्रिग्रही राजयोग; शुक्र-सूर्य देवाच्या कृपेने काही राशींचं आयुष्य पालटणार

SCROLL FOR NEXT