Ambernath News Saam Tv
मुंबई/पुणे

अंबरनाथ पालिकेची इमारत बनली धोकादायक; प्लॅस्टर कोसळून महिला जखमी

अजय दुधाणे

अंबरनाथ - पालिकेत प्लॅस्टर कोसळून एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. पतीची पेन्शन घेण्यासाठी ही वृद्ध महिला पालिकेत आली होती, यावेळी तिच्या डोक्यात प्लॅस्टर कोसळल्यानं तिला दुखापत झाली आहे. अंबरनाथ (Ambernath) नगरपालिका इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सिक्युरिटी केबिनबाहेर स्लॅबच्या प्लॅस्टरचा मोठा भाग अचानक कोसळला. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेत संदूवदी कासलिंगम या ६५ वर्षीय वृद्ध महिला जखमी झाल्या. आपल्या पतीची पेन्शन घेण्यासाठी त्या पालिकेत आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर पेन्शनचा फॉर्म देऊन परतत असतानाच त्यांच्या डोक्यात प्लॅस्टर कोसळलं. यात त्यांच्या डोक्याला इजा झाल्यानं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने छाया उपजिल्हा रुग्णालयात नेलं. तिथे डॉ. हरेश पाटोळे, डॉ. शुभांगी वाडेकर, डॉ. तृप्ती चव्हाण यांच्या टीमने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. यानंतर त्यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. तृप्ती चव्हाण यांनी माहिती दिली.

हे देखील पाहा -

अंबरनाथ नगरपालिकेची इमारत ही धोकादायक बनल्याचं समोर आलं असून पालिकेच्या अनेक विभागात प्लॅस्टर कोसळलं आहे. त्यामुळे दिवसभर पालिकेत बसून काम करणारे कर्मचारी अक्षरशः जीव मुठीत घेऊन बसतात. या कर्मचाऱ्यांनीही आता पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या सध्याच्या इमारतीचं बांधकाम १९७६ साली पूर्ण करण्यात आलं होतं. सध्या तब्बल ४६ वर्ष वयोमान असलेली पालिकेची इमारत जुनी आणि धोकादायक झाल्यानं २०१७ साली याच इमारतीच्या मागे नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात १८ महिन्यात हे काम पूर्ण होणं अपेक्षित असताना आता ४८ महिने उलटून गेले, तरी इमारतीतली कामं पूर्ण झालेलीच नाहीत. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर या इमारतीचं काम पूर्ण करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT