Indu Mill Dr babasaheb ambedkar Memorial
Indu Mill Dr babasaheb ambedkar Memorial Saam Tv
मुंबई/पुणे

'इंदूमिलमधील डॉ. आंबेडकरांचे स्मारक २०२३ च्या अखेरीस होईल'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईतील भव्यदिव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदूमिलमधील (Indu mill) स्मारक केव्हा होणार, याकडे देशातील साऱ्या लोकांचे लक्ष लागले आहे. या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडला होता. त्यानंतर या स्मारकाच्या कामाची पाहणी महाविकास विकास आघाडीतील वरिष्ठ नेते, मंत्र्यांनी वेळोवेळी जाऊन केली होती. या इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे(Dr. Babasaheb Ambedkar) हे अत्याधुनिक स्मारक २०२३ अखेरपर्यंत किंवा २०२४ सालच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाईल , असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर केले. (Indu Mill ambedkar Memorial Latest News )

हे देखील पाहा -

मंत्री धनंजय मुंडे यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे म्हणाले की, २०१६ साली या प्रकल्पाचे काम हाती घेतले त्यावेळी या प्रकल्पाची किंमत सहाशे कोटी होती. गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारने स्मारकासाठी पुढे येऊन काम केले आहे. आतापर्यंत २४५ कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत. जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी या वर्षी प्रकल्पासाठी राखून ठेवला आहे. सदर प्रकल्पासाठी ३०० कोटींचा खर्च झाला असून त्या निधीची तरतूद सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आली आहे'.

पुढे धनंजय मुंडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची वाट संपूर्ण देश पाहतोय. २०२३ अखेरीस किंवा २०२४ सुरुवातीपर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण होईल. त्याचे लवकर लोकार्पण होईल, या उद्देशाने जलद गतीने काम सुरू ठेवले आहे, अशी माहिती यावेळी मुंडे यांनी दिली. 'ज्या स्तंभावर स्मारक होणार आहे, त्या स्तंभाचे काम ७५ फुटापर्यंत पूर्ण झाले आहे. त्याचे आणखी २५ फुटाचे काम बाकी आहे. स्मारकापर्यंत जाण्यासाठी किती प्रदक्षिणा घालायाची आहे, त्या रचनेचं काम बाकी आहे. तसेच एक हजार लोकांची क्षमता असलेल्या वातानुकूलित सभागृहाचं काम सुद्धा सुरू आहे. तळाला पार्कींगचे काम देखील सुरू आहे. या स्मारकासाठी पैशाची कुठलीही अडचण येणार नाही', असेही मुंडे यांनी सांगतिले.

प्रकल्पात अंतर्भूत बांधकामाची 'ही' आहेत वैशिष्ट्ये

प्रवेशद्वार इमारतीमध्ये माहिती केंद्र, तिकीट घर, लॉक अप रुम, प्रसाधनगृह, सुरक्षा गृह, स्मरणिका कक्ष, नियंत्रण कक्ष इतर बाबींचा सामावेश आहे. स्मारकांची उंची ४५० फुटांपर्यंत असणार आहे. प्रेक्षकगृहाची आसनक्षमता १००० जणांची असेल. या प्रकल्पात संशोधन केंद्र, व्याख्यान वर्ग व ग्रंथालय , ध्यान केंद्र देखील असेल. तळघर वाहन तळाची क्षमता ही ४६० वाहनांची असेल.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivajirao Adhalrao Patil | "कोल्हेंनी भाजपचं दार ठोठावलं होतं", काय म्हणाले आढळराव पाटील?

Pat Cummins Statement: आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण? पॅट कमिन्सने विराट, रोहित नव्हे तर या खेळाडूचं घेतलं नाव

OTT Release This Weekend : ‘या’ आठवड्यात पाहता येणार क्राईम, ड्रामा, थ्रिलर चित्रपट आणि वेबसीरीज, जाणून घ्या यादी

Parenting Tips: उन्हाळ्यात मुलांना स्विमिंग क्लास लावण्याचा विचार करताय ? मग 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

Gautami Deshpande At Sangeet: गळ्यात हार अन् कानात झुमका,लगीन सोहळ्यासाठी सजली गौतमी

SCROLL FOR NEXT