अंबरनाथच्या वडापाव विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण; 'असा' रचला कट प्रदिप भणगे
मुंबई/पुणे

अंबरनाथच्या वडापाव विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण; 'असा' रचला कट

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने दोन दिवसांत केली मुलाची सुखरूप सुटका

साम टिव्ही ब्युरो

(प्रदिप भणगे)

डोंबिवली : सोनू कुमार बारेलाल हे वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा 9 वर्षीय मुलगा कृष्णा याचे अपहरण करून 40 लाखाची खंडणी मागणाऱ्या चौकडीला दोन दिवसांत पकडण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. प्रभात कुमार अमरसिंह 30, अमजद मन्सूर खान 23 वर्ष, योगेंद्र जवाहरलाल सिंग 20 वर्ष, सुनिल सिताराम लाड 57 वर्ष या चार आरोपीच्या आता मुसक्या आवळल्या आहेत. अंबरनाथ पूर्वेला राहणारे सोनू यांचा मुलगा कृष्णा हा इयत्ता चौथीत असून न्यू डेक्कन इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतो. सध्या शाळा बंद असल्यामुळे त्याचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र तो क्लासला जात होता.

...असा रचला अपहरणाचा कट

बुधवारी सायकांळी 7 वाजता तो नेहमीप्रमाणे क्लासला गेला मात्र घरी परत आला नाही. मुलाचे पालक व नातेवाईकानी त्याचा शोध घेतला मात्र तो कोठेही आढळून आला नाही. गुरुवारी सोनू यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परशुराम रेसिडेन्सी अंबरनाथ पूर्व येथून येत असताना एका अज्ञात इसमाने त्याचं अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यानुसार आपली सूत्रे फिरवली. याचदरम्यान कृष्णा याच्या आई वडिलांना मुलगा सुखरूप हवा तर 40 लाख रुपये द्या असा धमकीवजा खंडणीचा फोन आला. अपहरणकर्त्यांनी इंटरनेट कॉल चा वापर केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त जयजीत सिंग क्राईम ब्रँच व उल्हासनगर पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.

पोलिस उपायुक्त गुन्हे लक्ष्मीकांत पाटील ,सहायक पोलिस आयुक्त मोहिते व त्यांच्या पथकाने मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे अपहरण कर्त्यांचे छायाचित्र तयार केली व त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे शाखा घटक ३ येथे कार्यरत असणारे पोलीस अंमलदार विनोद चन्ने, किशोर पाटील आणि बाळा पाटील यांना गुप्त बतमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार घटक 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील, पो.उप.नि कळमकर व त्यांच्या पथकाने सापळा रचत आंबिवली येथून अपहरण कर्त्याना ताब्यात घेतले व कृष्णाची सुखरूप सुटका केली. यातील एक आरोपी तीन ते चार दिवस त्या परिसरात वावरत होता. कृष्णाशी क्रिकेट खेळणे, चॉकलेट देणे त्याचप्रमाणे इतर बोलणं करत त्याने जवळीक वाढवली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT