Ambadas Danve, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ambadas Danve, Devendra Fadnavis, Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Ambadas Danve : शिंदे गटातील आमदाराला त्वरित अटक करा; अंबादास दानवे यांची फडणवीसांकडे मागणी

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांना त्वरीत अटक करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार तसेच विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. सबळ पुरावे असूनही सरवणकर यांना अटक होत नसल्याने ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण करणारी आहे, असंही दानवे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

गेल्यावर्षी गणेश विसर्जनादरम्यान पोलीस ठाण्याबाहेर जमावाच्या दिशेने केलेल्या गोळीबार प्रकरणी घटनास्थळावरून जप्त केलेले काडतुस हे आमदार सदा सरवणकर यांच्या जप्त केलेल्या परवानाधारक बंदूकीतील असल्याचे कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बॅलेस्टिक अहवालातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे दोषी असलेल्या आ. सरवणकर यांना अटक करून या गोळीबाराचा तपास जलद गतीने करण्यात यावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. (Maharashtra Political News)

२०२२ च्या विसर्जनादरम्यान पोलीस ठाण्याबाहेरील जमावाच्या दिशेने गोळी झाडल्याप्रकरणी सरवणकर व त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात आर्म्स कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करूनही सबळ पुराव्याअभावी अटक करण्यात आली नव्हती. मात्र आता प्रयोग शाळेने ती गोळी त्यांच्याच बंदुकीतून झाडल्याचा सबळ पुरावा सादर केला आहे. तरी देखील सरवणकर यांना अद्याप अटक करण्यात का आली नाही, असा सवाल अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपस्थित केला आहे.

सबळ पुरावे असूनही सरवणकर यांना अटक न होणं ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण करणारी असल्याची दानवे यांनी म्हटले. सदर घटनेतून काही अनुचित प्रकार घडला असता तर राज्यात कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण झाली असती.

याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यदर्शीचा शोध घेऊन त्यांचा जवाब नोंद करण्यासाठी करण्यात येणारी दिरंगाई म्हणजे सदर गुन्ह्यांत पोलीस जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहेत किंवा राजकीय दबावापोटी दोषींना अटक करण्यात टाळाटाळ करत आहे, असा संशय निर्माण झाल्याने दानवे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

एखादे प्रकरण, घटना घडल्यावर शासन व मुंबई पोलिसांकडून त्वरित कारवाई होते ती या प्रकरणी होताना दिसत नाही. त्यामुळे फडणवीस यांनी स्वतः जातीने लक्ष घालून दोषींवर योग्य ती कलमे लावून त्वरितअटक करण्याचे आदेश देण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Forest : शिकारीच्या तयारीत असलेला शिकारी वन विभागाच्या ताब्यात; घरातून अस्वलाचे दोन नखे केली जप्त

Helicopter Crash Video: हवेत गिरट्या घातल्या; हेलकावे खाल्ले अन् क्षणात कोसळलं.. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश; थरारक VIDEO

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: १३ जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिवसेना; १५ ठिकाणी काँग्रेस -भाजप 'सामना', कुठे-कोण आमनेसामने?

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT