Sharad Pawar and uddhav thackeray File photo  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut On Sharad Pawar: शरद पवारांच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप चुकीचे, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Lok Majhe Sangati: खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शरद पवारांनी पुस्तकातून केलेला आरोप चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Priya More

Belgaon News: 'उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात जाणं आमच्या पचनी पडणारं नव्हतं', अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) आत्मचरित्रातून व्यक्त केली होती. शरद पवारांच्या या मतानंतर आता शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शरद पवारांनी पुस्तकातून केलेला आरोप चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले आहे. बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, 'शरद पवारांनी पुस्तकात केलेला आरोप चुकीचा आहे. उद्धव ठाकरे हे फक्त दोन दिवस मंत्रालयात गेले ही चुकीची माहिती आहे. ते सातत्याने मंत्रालयात जात होते. फक्त कोरोना काळात त्यांचे जाणं कमी झालं होतं. केंद्र सरकारच्या तशा सूचना होत्या. पंतप्रधान आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री कार्यालयात जात नव्हते. वर्क फ्रॉम होम करणे या केंद्राच्याच सूचना होत्या.'

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'शरद पवारांनी या पुस्तकात जे काही लिखाण केले असेल ते दोन दिवसात लोकं वाचतिल. नंतर हे पुस्तक ग्रंथालयात जाईल. शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल जे काही मत मांडली असतील त्या सगळ्या विषयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच सामनाला मुलाखत देणार आहेत. या मुलाखतीमध्ये ते यावर उत्तर देतील.'

शरद पवार यांनी 'लोक माझे सांगती' या आत्मचरित्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामाचा उलगडा केला आहे. या पुस्तकात त्यांनी असे लिहिले आहे की, 'मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचं मंत्रालयात फक्त दोनदा जाणं आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं.' तसंच, 'बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धवशी बोलताना नव्हती.', अशी टिपण्णी देखील त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप आमदारासह 100 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

Bridal Skin Care Tips: नवरीसाठी खास 5 स्किनकेअर टिप्स, लग्नात चेहऱ्यावर येईल चमक

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT