Mumbai- Govandi (Shivaji Nagar) Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai: शिवाजीनगर सामूहिक बलात्कार प्रकरणी सगळे आरोपी गजाआड

त्यावेळी त्यांनी फिर्यादीशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादींनी ओरडण्यास सुरवात केली.

जयश्री मोरे

गोवंडी : शिवाजी नगर पोलीस (Shivaji Nagar Police Station Govandi) ठाण्याच्या हद्दीत तरुणीवर सामुहीक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. फिर्यादी तरुणी कॅटरींगचे काम करून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील जुना बस डेपो येथून पहाटे ४.३० वा च्या सुमारास घरी पायी जात असताना मट्टी रोडच्या बाजुला असलेल्या झोपडपट्टी समोरील रिकाम्या जागेत तिच्या परिचयाचे आणि त्याच परिसरात राहणारे चार तरुण भेटले. त्यातील एका तरुणाने फिर्यादीला कोठून आली अशी विचारणा केली त्यावेळी फिर्यादीनी त्यांना केटरींगचे काम करून घरी जात असल्याचे सांगितले. यावर त्यातील एका तरुणाने फिर्यादींना "तुमसे बात करणी हे मेरे साथ चलो " असे बोलून रस्त्याच्या बाजुला असलेल्या झोपडपट्टीतील एका उघडया रिकाम्या घरातील पोट माळ्यावर नेले त्याच वेळी नमुद तरुणाचे इतर साथिदार देखील त्यांच्या पाठोपाठ घरात आले.

त्यावेळी त्यांनी फिर्यादीशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादींनी ओरडण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यातील एका तरुणाने फिर्यादीच्या तोंडावर हात ठेवून फिर्यादाशी जबरदस्ती करून त्याच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. व तेथून ते पळून गेले. यावर फिर्यादी मुलीने पोलीसांना फोनवरून सदर घटनेची माहिती दिली. शिवाजी नगर पोलिसांनी यावर गुन्हा नोंदवत दहा वेगवेगळी पथके तयार करून गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना केली. पोलिसांना बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीवरून व तांत्रिक कौशल्याने पोलीस पथके तयार करून सगळ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाकारी जोडव्यांचे फॅन्सी डिझाइन; चारचौघीमध्ये तुमचा लूक दिसेल रॉयल

Maharashtra Live News Update: लोकसभा अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव रद्द; आवाजी मतदानाने फेटाळला प्रस्ताव

Explainer : जगात सर्वाधिक गॅसचे उत्पादन कोणता देश करतो? कसा तयार केला जातो स्वयंपाकाचा गॅस?

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये झुरळं अन् ढेकणांचा सुळसुळाट, प्रवाशांची होतेय गैरसोय; VIDEO व्हायरल

Pune Crime: रमजानच्या महिन्यात पुणे हादरलं! किरकोळ वादानंतर ६ जणांनी फैसलच्या छाती, पाठीत भोसकला चाकू, CCTV Video व्हायरल

SCROLL FOR NEXT