तळीरामांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात दारू झाली स्वस्त, एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी घटवली Saam Tv
मुंबई/पुणे

तळीरामांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात दारू झाली स्वस्त, एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी घटवली

महाराष्ट्रामध्ये सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवर असलेले उत्पादन शुल्कामध्ये ५० टक्के कपात करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्रामध्ये सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवर असलेले उत्पादन शुल्कामध्ये ५० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे राज्यात त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झाली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली आहे. “स्कॉच व्हिस्कीवर असलेले उत्पादन शुल्क उत्पादन खर्चामधून ३०० वरून १५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार की, गुरुवारी या संदर्भामध्ये अधिसूचना जारी करण्यात आली आहेत. आयात करण्यात येणाऱ्या स्कॉचच्या विक्रीमधून महाराष्ट्र सरकारला वार्षिक १०० कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. या कपातीमधून सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. कारण यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढणार आहे.

हे देखील पहा-

शुल्कामध्ये कपात केल्याने इतर राज्यामधून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रिला देखील मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. उत्पादन शुल्कामध्ये कपात केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किमती कमी झाले आहेत. यामुळे राज्याच्या महसुलामध्ये वाढ होणार आहे. सध्या एका दिवसामध्ये १ लाख बाटल्या विकले जातात, शुल्क कमी केल्यावर बाटल्यांची विक्री अडीच लाखांवर येऊन पोहोचू शकते.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये सरकारला दारूपासून सर्वाधिक महसूल मिळत आहे. महाराष्ट्रात आयात व्हिस्कीच्या दरात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे व्हिस्कीच्या किमतीमध्ये कमालीची घट झाली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेला कमी किमतीत आयात स्कॉच मिळणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT