CM Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde: दोन वर्षात ६०० निर्णय घेतले, पण 'लाडकी बहीण' योजना आली अन्... CM शिंदेंच्या भाषणाची जोरदार चर्चा!

CM Eknath Shinde Alandi Visit: 'काही लोक १५०० रुपयात विकत घेता का? लाच घेता का? असं म्हणतात. पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांना 1500 ची काय किंमत," असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

गोपाल मोटघरे

CM Eknath Shinde Visit Alandi: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आळंदीच्या दौऱ्यावर आहेत. वारकरी संप्रदायातील मानबिंदू शांतीब्रह्म ह. भ. प. मारोती महाराज कुरेकर बाबा यांच्या 93 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळीमारोती महाराज कुरेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शांतीब्रम्ह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

"महाराष्ट्र ही संतांची भूमी. कु-हेकर बाबा आणि ढोक महाराजांचे अभिनंदन. यायला उशीर झाला त्याबद्दल त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम आयुष्यातला सगळ्यात आनंद देणारा आहे. संताचे पूजन यापेक्षा दुसरं भाग्य काय असतं. राजकीय अधिष्ठानापेक्षा संतांचे अधिष्ठान मोठे आहे. ते समाज घडवण्याचे काम करतात. धर्मवीर आनंद दिघेही प्रत्येक हरिनाम सप्त्याला न चुकता जायचे," अशी आठवण यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली.

विरोधकांवर निशाणा..

"आम्ही आजपर्यंत ६०० निर्णय घेतले, अनेक निर्णय माझ्या लाडकी बहीण योजने खाले दबून गेले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरु केली. एखादी योजना लगेच सुरू करता येत नाही त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. मी सामान्य घरातला मुलगा आहे. आईची काटकसर बघितलेला मुलगा आहे. काही लोक १५०० रुपयात विकत घेता का? लाच घेता का? असं म्हणतात. पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांना 1500 ची काय किंमत," असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

२ वर्षात काय काय करणार?

"अनेक वर्षापासून बंद पडलेले प्रकल्प सुरू केले. शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीकविमा अशा अनेक योजना आणल्या. 2 वर्षात मी काय काय करायचे. एकनाथ शिंदेला थोडा तरी टाईम देणार का नाही? एकनाथ शिंदे खोटा बोलत नाही. बाळासाहेब ठाकरे सांगायचे शब्द देण्याआधी 10 वेळा विचार करा. त्यामुळे आम्ही दिलेला शब्द पाळतो. लाडकी बहिण योजनेसाठी पुढील 1 वर्षाची तरतूद केलेली आहे. ही ओवाळणी कायम मिळेल. माझ्याकडे कुणी काम घेऊन आला तर त्यांचं विदाऊट फी काम करतो. एव्हढीच अपेक्षा आहे की माझ्याकडे आलेला एकही व्यक्ती खाली हात जाऊ नये. शपथविधीला देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र होतो तो देखील इतिहास घडला. असा इतिहास घडवायला धाडस लागतं, अशी कोपरखळीही मुख्यमंत्र्यांनी मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT