Alandi Indrayani Ghat transgender group clash latest news saam tv
मुंबई/पुणे

Transgender Fight: बस्ती मागण्यावरून वाद विकोपाला; आळंदीच्या इंद्रायणी घाटावर तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

Transgender Groups Clash Indrayani Ghat: आळंदीच्या इंद्रायणी नदी घाटावर बस्ती मागण्याच्या वादातून तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी पाच तृतीयपंथीयांसह दोन अनोळखी पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

  • बस्ती मागण्याच्या कारणावरून तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

  • या प्रकरणी पाच तृतीयपंथीयांसह दोन अनोळखी पुरुषांविरोधात गुन्हा दाखल

  • फिर्यादी योगेश सतीश गनमोटे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुण्यातील आळंदीत असलेल्या इंद्रायणी नदी घाटावर तृतीयपंथींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत 3 मंगळसूत्र आणि 2 मोबाईल गहाळ झाले. याप्रकरणी परी यादव, सनम, खुशी, राणी, अंजली (सर्व रा. निगडी ) या पाच तृतीयपंथींसह दोन अनोळखी पुरुषांवर आळंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर रविवारी (ता. 6) घडली. याबाबत फिर्याद योगेश सतीश गनमोटे (वय 26, रा. खंडोबा मंदिराजवळ, आळंदी) या तृतीयपंथी व्यक्तीने दिली आहे. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश गनमोटे आणि त्याचे अन्य तृतीयपंथी साथीदार आळंदीतील इंद्रायणी घाटावर बस्ती मागत होते.

या बस्ती मागण्याच्या कारणावरून निगडीतील आरोपी परी यादव, सनम, खुशी, राणी, अंजली आणि दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी आणि त्यांच्या बरोबरच्या अन्य तृतीयपंथींना फायटरने मारहाण करीत शिवीगाळ केली. या मारामारीत तृतीयपंथी एकमेकांना जमिनीवर लोळवले. दोन तृतीयपंथींचे केस ओढून फरपटत नेल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तसेच प्रशांत पद्माकर गरड उर्फ प्रज्ञा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, फिर्यादी योगेश गनमोटे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, तसेच स्वाती निंबा आहेर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि दोन मोबाईल या भांडणामध्ये गहाळ झाले.

तृतीयपंथींमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीचा परिणाम इंद्रायणी घाटावर फिरणाऱ्या अन्य भाविकांवर झाला. अचानक झालेल्या हाणामारीमुळे सर्वांची पळापळ झाली. बघ्यांमधील काहींनी पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व तृतीयपंथींना ताब्यात घेऊन गेले.दरम्यान, आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मागील दोन-तीन वर्षांमध्ये इंद्रायणी घाट, शनी मंदिर परिसर तसेच माऊली मंदिरासमोरील महाद्वार भागामध्ये तृतीयपंथींचे भीक मागण्याचे प्रकार वाढले आहेत. पैसे दिले नाहीत तर येथील व्यावसायिकांना तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आणि लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडींनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जाते. या भागात तृतीयपंथीयांना फिरकू न देण्याची मागणी शहरातून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT