Ajit Pawars Funny Answer To Neelam Gorhe, Pune Latest Marathi News, Neelam Gorhe News, Ajit Pawar News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : शिवाईच्या कार्यक्रमात नीलम गोऱ्हेंची मिश्कील टिप्पणी; अजित पवारांचं खास शैलीत उत्तर

Ajit Pawar On Nilam Gorhe : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्याबाबत अजित पवारांनी असं काही उत्तर दिलं की, उपस्थितांमध्ये हशाच पिकला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या हजरजबाबीपणामुळे आणि रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच वेळेचं बंधन पाळणारे आणि कुठेही पहाटे पोहोचणारे नेते म्हणूनही ते अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. अनेक कार्यक्रमांना ते अनेकदा वेळेच्या अगोदरच पोहोचतात. त्यामुळे आयोजकांची आणि अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते. आजही त्यांनी शिवाई बसच्या (Electric Bus) उद्घाटन सोहळ्यात केलेल्या फटकेबाजीमुळे त्यांची अनोखी शैली पुन्हा दिसून आली आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी (Nilam Gorhe) केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी असं काही उत्तर दिलं की, उपस्थितांमध्ये हशाच पिकला. (Ajit Pawars Funny Answer To Neelam Gorhe In The shivai Electric Bus Inauguration Ceremony in Pune)

हे देखील पाहा -

नेमकं काय घडलं?

शिवाई इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता सुरु होणार होता. मात्र अजित पवार याठिकाणी साडेआठ वाजताच पोहोचले. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. याबाबत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आम्ही कितीही लवकर आलो तर अजितदादा आमच्या वेळेअगोदरच पोहोचलेले असतात. आमच्या झोपायची व्यवस्था इथेच करा असं आयोजकांना सांगायचं का? असा मिश्किल प्रश्न त्यांनी विचारला. पुढे त्या म्हणाल्या की, जर कार्यक्रम ९ चा असेल आम्ही पावणे नऊला आलो, पण अजितदादा साडेआठलाच हजर असतात. पण, इतके ते कार्यक्षम आहेत म्हणजे आम्ही उशीरापर्यंत झोपतो असं नाही असा मिश्किल टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.

अजित पवारांच प्रत्युत्तर

निलम गोऱ्हेंच्या या मिश्किल टीप्पणीवर शांत बसतील ते अजित पवार कसले? त्यांनीही निलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर दिलं की,"मी इथं लवकर आलो, पण नऊ वाजेपर्यंत तुमच्यासाठी थांबायचं ठरलं होतं. म्हणून आम्ही गोल करून गप्पा मारत बसलो. अनिल परबसुद्धा सोबत होते. निलमताई तुम्ही वेळेत कार्यक्रमाला आलात. आम्ही तुमच्यासाठी थांबलेलो, पण परब साहेबांनीच कार्यक्रम सुरू करायला सांगितलं. मी त्यांना म्हणालोही की निलमताई येतील, त्या उपसभापती आहेत, आपण थांबायला पाहिजे. पण परब साहेबांनी ऐकलं नाही. आता ते शिवसेनेचे तुम्ही शिवसेनेच्या तुमचं तुम्ही बघून घ्या" असं म्हणाताच कार्यक्रमात हशा पिकला आणि टाळ्याचा गडगडाट झाला.

दरम्यान शिवाई बसबाबत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आज एसटी महामंडळाच्या ७४ वर्षांच्या कारकिर्दीतला फार महत्वाचा क्षण आहे. ज्यावेळेस १९४८ साली पहिली बस सोडली होती. ती पुणे ते नगर येथे सोडली होती. तशाच पद्धतीने, मी अनिल परब, नीलमताई आम्ही सगळ्यांनी मिळून वातानुकूलीत बस जी इलेक्ट्रिकवर आहे. ज्यात प्रवास करताना प्रवाशांना आराम मिळणार आहे. सुखद अशा प्रकारच्या प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. यात पर्यावरणाचा पुर्णपणे विचार केला गेलेला आहे. प्रदूषण अजिबात होणार नाही. याची खऱ्या अर्थाने गरज होती. जगात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या बसेस सुरु झालेल्या आहेत. महाराष्ट्रातही इतक्या चांगल्या प्रतीच्या बसेस आमच्या महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत असं अजित पवार म्हणाले.

'शिवाई'ची ठळक वैशिष्ट्ये…

- बसची लांबी १२ मीटर

- टू बाय टू आसन व्यवस्था

- एकूण ४३ आसने

- ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत गाडी

- गाडी ताशी ८० किमी वेगाने धावणार

- बॅटरी क्षमता ३२२ के.व्ही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

SCROLL FOR NEXT