Ajit Pawar  Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News : अजित पवारांचा विधानसभेसाठी नवा डाव? यंदा कोणत्या मतदारसंघातून मैदानात उतरणार? वाचा

Ajit Pawar Latest News : अजित पवारांची विधानसभेसाठी नवा डाव टाकला आहे. यंदा अजित पवार हे शिरूरमधून मैदानातून उतरण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदा विधानसभेला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत. तर ते शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची कसोटी लागणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. लोकसभा निवडणुकीतही बारामतीकरांनी शरद पवारांना साथ दिली. लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातही सुप्रिया सुळे यांना मोठी लीड मिळाली. त्यामुळे अजित पवारांनी पर्यायी मतदारसंघाची शोधाशोध करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिरुर-हवेली हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. सेना-भाजप युतीतमध्येही हा मतदारसंघ भाजपकडेच होता. याच विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा सोडल्याचं बोललं जात आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजपने शिरुर-हवेली मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या नाहीत.

एकीकडे पुणे जिल्हा आणि शहरातील भाजपच्या वाट्याला येणाऱ्या सर्व संभाव्य जागांवरील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. मात्र, शिरुर-हवेलीत मुलाखती नाही. मुलाखती न झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. पक्ष श्रेष्ठींकडूनही भाजप कार्यकर्त्यांना ठोस आश्वासन नाही.

अशोक पवार हे शिरुर-हवेलीचे विद्यमान आमदार आहेत. अशोक पवार हे राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या पक्षात आहेत. अजित पवार यांनी शिरुर-हवेलीमधून निवडणूक लढवल्यास विजयी होण्याचा अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.

अजित पवारांनी दिलं होतं खुलं चॅलेंज

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना खुलं चॅलेंज दिलं होतं. 'पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना थेट आव्हान दिलं होतं. अजित पवारांनी आव्हान दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवारांच्या आव्हानानंतर अशोक पवारांनी देखील पलटवार केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT