Ajit Pawar and Devendra Fadnavis locked in a political face-off over the Pune Metro issue ahead of civic polls. Saam Tv
मुंबई/पुणे

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

Ajit Pawar Bajirao Pune Metro Controversy: अजित पवारांनी मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत देण्याची घोषणा केल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपनं दादांवर निशाणा साधलाय... त्यामुळे पुण्याचा बाजीराव नेमका कोण आहे? पुण्यात मेट्रोचा मुद्दा नेमका का तापलाय?

Suprim Maskar

पुणे महापालिका निवडणुकीवरून राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच जुंपल्याचं चित्र महाराष्ट्रानं बघितलं. आपल्या जाहीरनाम्यात अजित पवारांनी मोफत मेट्रो आणि बस प्रवासाचं आश्वासन दिलं आणि त्यांच्या सत्तेतल्या मित्रांनीच त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. 'खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा' अशी टीका फडणवीसांनी केल्यानंतर अजित पवारांनी पुण्याचा बाजीराव मीच, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं.

याआधीही फडणवीसांनी अजित पवार यांच्या मोफत मेट्रो प्रवासाच्या आश्वासनाची खिल्ली उडवली होती. तेव्हा त्यावेळीही जिंकून आलो की करून दाखवेन, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांनाच आव्हान दिलं..

मेट्रोचा मुद्दा का तापला?

पुण्यात आयटी हब आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त

वाहतूक कोंडी हा पुणेकरांचा कळीचा मुद्दा

वाहतुक कोंडीच्या वाढत्या समस्येवर मोफत मेट्रोचं आश्वासनं

महत्त्वाचा मुद्दा दादांनी हायजॅक केल्यानं भाजपकडून पलटवार

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो...मात्र 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात गेला. हा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी दादा आक्रमक झाले असतानाच आपली सत्ता टिकवण्यासाठी भाजपनं कंबर कसलीय..मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं आणि अजित पवारांनी प्रचार काळात आपला मुक्काम पुण्यातच कायम ठेवल्यानं भाजपपुढे मोठं आव्हानं उभं राहिलयं...त्यातूनच मेट्रोच्या श्रेयवादापासून मोफत मेट्रोच्या आश्वासनापर्यंत आरोप-प्रत्यारोपाला जोर चढलाय... त्यामुळे ग्लोबल ग्रोथ हब असणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा बाजीराव नेमका कोण हे कळण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत ..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT