बारामती- तुषार खलाटे याच्या फिरत्या चहा विक्री केंद्राचे उदघाटन केल्यानंतर चहाचा आस्वाद घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार - Milind Sangai
मुंबई/पुणे

...अजित पवारांनी राखले कार्यकर्त्याचे मन आणि घेतला चहाचा आस्वाद

मिलिंद संगई

बारामती : कार्यकर्त्याचा आग्रह होतो आणि त्या आग्रहाला नाही म्हणणे दस्तुरखुद्द अजित पवार Ajit Pawar यांनाही शक्य होत नाही, त्याच्या फिरत्या सेंद्रीय गुळाच्या चहाच्या दुकानाचेही उदघाटन उपमुख्यमंत्री Deputy CM करतात आणि उभ्या उभ्या त्याच्या गुळाच्या चहाचा Tea आस्वादही ते घेतात. बारामतीत Baramati आज (ता. 25) घडलेला हा किस्सा. Ajit Pawar tested tea at party workers stall in Baramati

तालुक्यातील कांबळेश्वर येथील तुषार खलाटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आपला हक्क आपला व्यवसाय या उपक्रमाखाली फिरत्या चहा विक्रीच्या दुकानाची सुरवात केली आहे. आज महाआरोग्य अभियानाच्या निमित्ताने अजित पवार येणार होते. त्या वेळेस तुषार यांनी अजित पवार यांना आपल्या या छोट्याशा व्यवसायाचे उदघाटन तुम्ही करावे अशी इच्छा बोलून दाखवली.

क्षणाचाही विलंब न करता पवार लगबगीने त्याच्या फिरत्या दुकानाजवळ गेले, त्यांनी फीत कापून उदघाटन केले आणि त्याने दिलेल्या गुळाच्या चहाचा आस्वादही घेतला. तेवढ्या वेळात त्यांनी व्यवसाय व त्याच्याविषयीही चौकशी केली. Ajit Pawar tested tea at party workers stall in Baramati

अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मध्यस्थाची गरज लागत नाही, ते सर्वांनाच सहजतेने उपलब्ध होतात व कार्यकर्त्यांचे मनही राखतात याचा प्रत्यय या छोट्याशा घटनेने आज पुन्हा एकदा सर्वांना आला. आपल्या दुकानाचे उदघाटन स्वताः अजित पवार यांनी केल्याचा आनंद तुषार याच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होता. चांगला व्यवसाय करा अशा सदिच्छाही जाता जाता पवार यांनी त्याला दिल्या.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते? आताच वाचून घ्या

Sunday Horoscope : पार्टनरला मनातलं सांगून टाका; ५ राशींच्या लोकांचे 'अच्छे दिन' सुरू होणार

काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला; नगरसेविकेने बड्या नेत्याला कानफटवलं

Political News: भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री स्थापन करणार नवा पक्ष; राजकारणात खळबळ

महाराष्ट्रात आणखी एक उष्मघाताचा बळी; काही जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार

SCROLL FOR NEXT