Ajit Pawar on Contract Recruitment Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: कंत्राटी भरतीचा निर्णय योग्यच होता, पण... अजित पवारांकडून समर्थन, विरोधकांवर टीका

Ajit Pawar on Contract Recruitment: अजित पवार यांनी कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय योग्य होता, असं म्हणत या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

Satish Daud

Ajit Pawar on Contract Recruitment

राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला कंत्राटी नोकरभरतीचा शासन निर्णय शुक्रवारी रद्द करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषद घेत हा निर्णय रद्द केला असल्याची माहिती दिली. कंत्राटी भरतीचं १०० टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं आहे असा आरोप फडणवीस यांनी केला. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)

कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय योग्य होता. पण विरोधकांनी याबाबत तरुणांमध्ये गैरसमज पसरवला. नोकऱ्या जाणार, नोकऱ्या मिळणार नाही, असा गैरसमज अनेकांचा होता. म्हणून आम्ही हा निर्णय मागे घेतला, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

याआधी सुद्धा अजित पवार यांनी कंत्राटी भरतीचं समर्थन केलं होतं. त्यांचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका देखील केली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय योग्य होता, असं म्हणत या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसने काढला आहे. कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

कंत्राटी भरती कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप आहे. आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल करत देखील फडणवीस यांनी केला. कंत्राटी भरतीबाबत गैरसमज पसरवण्यात आल्याने सरकारने हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : 'बारामतीतून उभं राहणार नव्हतो, तर....'; भरसभेत अजित पवारांचा मोठा खुलासा, VIDEO

Uddhav Thackeray : मला भावी मुख्यमंत्री म्हणतात, पण...; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले,VIDEO

Uddhav Thackeray: तुम्ही मला संपवू शकत नाहीत; परभणीत उद्धव ठाकरे मोदी, शहांवर कडाडले

Raj Thackeray: नगरसेवक असतो का? महापालिकेच्या निवडणुकांवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Batami Magachi Batami : कुठून आलं,'बटेंगे तो कटेंगे'; नारा राजकारणात आला कसा? VIDEO

SCROLL FOR NEXT