Ajit PAwar Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar News : पीएचडी करुन काय दिवे लावणार? अजित पवारांच्या वक्तव्यानंतर विद्यार्थी आक्रमक

Ajit Pawar News : राष्ट्रवादी फुटीच्या राजकारणावर एखादा विद्यार्थी पीएचडी करेल ही अजित पवारांना भीती आहे का? असा सवाल पीएचडीचा अभ्यास करणाऱ्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी केला आहे.

प्रविण वाकचौरे

रणजीत माजगांवकर, अक्षय बडवे

Ajit Pawar News :

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहे. विधानपरिषदेत शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर, पीएचडी करुन विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत? असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यावरुन पीएचडी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठासमोर पीएचडीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या राजकारणावर एखादा विद्यार्थी पीएचडी करेल ही अजित पवारांना भीती आहे का? असा सवाल पीएचडीचा अभ्यास करणाऱ्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी अजित पवार यांना केला आहे.

संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणे हे गरजेचे आहे. देशात आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी पीएचडी मिळवली आहे, त्या सगळ्यांचा अपमान अजित पवार यांनी केला आहे, अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली आहे. यावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

पुण्यात देखील विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः दहावी फेल आहेत. त्यांनी पीएचडी संदर्भात कुठलेही वक्तव्य करू नये आणि केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली आहे. सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. यातच पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्तीसुद्धा दिली जाते.

काय म्हणाले अजित पवार?

मात्र ती केवळ २०० विद्यार्थ्यांना दिली जाते. ही संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली. यावर राज्यात होत असलेल्या पीएचडींपैकी खरंच किती पीएचडींची आपल्याला गरज आहे? संख्या वाढवून काय करणार? पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असं धक्कादायक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभागृहात केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack symptoms: हार्ट अटॅक आला की शरीरात नेमकं काय घडतं? डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून वेळीच धोका ओळखा

Salman Khan : छातीत दुखायला लागलं, स्टेजवर कोसळला; सलमानची तब्येत पाहून चाहते चिंतेत, Bigg Boss मध्ये नेमकं काय घडलं?

Haunted Beach : भारताचा सर्वात भयानक बीच, सूर्यास्तानंतर इथे जाण्याची हिंमत कोण करत नाही

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- गौरी गणपती विसर्जनानंतर आता कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

Water for weight loss: बॅलन्स डाएटसोबत प्या 'या' मसाल्याचं पाणी, वजन होईल झटक्यात कमी

SCROLL FOR NEXT