Ajit pawar
Ajit pawar  Saam TV
मुंबई/पुणे

महाराष्ट्र असा तसा वाटतो का? अजित पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; सरकारलाही सुनावलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

Maharashtra-Karnataka Border Dispute: जत तालुक्यातल्या 40 गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी (Basavaraj S Bommai) आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. "महाराष्ट्र मागायला निघाले का? महाराष्ट्र असा तसा वाटतो का?, महाराष्ट्र हे कदापि खपवून घेणार नाही" असे खडेबोल अजित पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सुनावले आहेत. (Ajit Pawar Latest News)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) सुरू असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे दोन्ही राज्यात आणखी तेढ निर्माण झाला आहे. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. सोबत महाराष्ट्र सरकारलाही खडेबोल सुनावले आहेत. अजित पवार म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गेले दोन दिवस जे वक्तव्य केले त्याचा धिक्कार करतो. हे महाराष्ट्र मागायला निघाले का? महाराष्ट्र असा तसा वाटतो का? सातत्याने बघतो ही, लोक ज्यांचा सबंध नाही अशी वक्तव्य करून लक्ष विचलीत करत आहे असं म्हणत अजित पवारांनी बोम्मईंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना कडक शब्दांत सुनावलं पाहिजे अंस म्हणत अजित पवारांनी राज्य सरकारलाही सुनावलं आहे. (Latest Marathi News)

पुढे अजित पवार म्हणाले, आता फक्त मुंबई मागणं बाकी ठेवलं आहे. या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र हे कदापि खपवून घेणार नाही. हे ताबडतोब थांबवले पाहिजे अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. तसेच बेरोजगारी आणि महागाई यावरुन लोकांचं लक्ष हटवण्यासाठी हे सुरू असल्याचा आरोपही अजित पवारांनी केली आहे. राज्याचा अस्मितेचा प्रश्न असतो, अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंघ ठेवण्याचा काम केलं. महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलं आहे.

ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्यावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बुधवारी, २३ नोव्हेंबरला शिर्डीला गेले असताना अचानक त्यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी सिन्नरमध्ये जाऊन एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंचे कान टोचले आहेत. "ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं म्हणजे २१ व्या शतकात सर्व जग चाललं असताना आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखं आहे," असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

अजित पवार म्हणाले, आम्ही शिर्डीला किंवा पंढरपूरला गेलो तर दर्शन घेतो, ही आपली परंपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो. पण ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे २१ शतकात जग कुठे चालले आहे? बदल होत असताना सायन्स काय सांगतं. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात काय बोलावं? आमच्यासारखे तर हतबलच झालेत, असं म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक; ६ जणांची प्रकृती गंभीर

Kitchen Tips: साबण आठवड्यातच संपतो ?; फॉलो करा 'या' टीप्स

MI Playoffs Scenario: मुंबई इंडियन्सला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! कसं असेल समीकरण?

Madha Lok Sabha: माढ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

Ranbir - Sai Photos Viral Ramayana Movie : ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा फोटो व्हायरल, लूक पाहून नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT