Ajit Pawar on CM Eknath Shinde Chair  Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar on CM Eknath Shinde Chair : अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले; विधानसभा अध्यक्षांनीच काढलं स्टिकर, व्यासपीठावर नेमकं काय झालं?

Political News : अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. अजित पवारांचे समर्थकही दादा लवकरच मु्ख्यमंत्री होतीत, असं अनेकदा बोलले आहेत. आज अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण आलं आहे.

मनोरा आमदार निवास भूमीपूजन कार्यक्रम आज पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं नाव असलेल्या खुर्चीवर अजित पवार बसले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आरक्षित असलेल्या खुर्चीवरील स्टिकर काढलं. त्यानंतर अजित पवार त्या खुर्चीवर बसले.  (Latest News Update)

राहुल नार्वेकर काय म्हणाले?

या घटनेनंतर सुरु झालेल्या चर्चांवर बोलताना राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, आजच्या मंगलमय दिनी निरर्थक चर्चेला सुरुवात करु नका. मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार होते. मात्र त्यांना काही वैयक्तिक काम आल्याने ते येऊ शकले नाहीत. कोणाचीही नाराजी नाही. एवढा चांगला कार्यक्रम होत असताना निरर्थक चर्चा नको. (Political news)

भरत गोगावले म्हणाले...

अजित पवार हे अनावधानाने त्या खुर्चीत बसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कणकण जाणवत होती. त्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, असं शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं.

कसं असेल मनोरा आमदार निवास?

मनोरा आमदार निवासाच्या कामाचा आज शुभारंभ झाला. यामध्ये ३६८ अपार्टमेंट असतील. ही वास्तू विविध सुविधांनी सुसज्ज असेल. याठिकाणी ८५० गाड्या पार्किंची सुविधा देखील असेल. ७.५० लाख चौरस फुटांचे बांधकाम होणार आहे. सीआरझेडच्या नियमामुळे बांधकामास विलंब होत होता. मात्र आता हे काम अडीच वर्षात पूर्ण केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil : गौतमी पाटीलचा दिवाळी लूक पाहिलात का? लाल साडीत खुललं सौंदर्य | PHOTOS

सकाळ, दुपार की संध्याकाळी? तुम्ही चुकीच्या वेळी चहा पित नाही ना, शरीरावर काय होतात परिणाम?

Maharashtra News Live Update: दुष्काळी परिस्थितीत पाच हजारांची अग्रीम मदत शेतकऱ्यांसाठी ठरली दिलासादायक

दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास करताय? मिसिंग लिंकच्या दोन मार्गिका बंद; दुरुस्तीच्या कामामुळे प्रवाशांची गैरसोय

Thane : ठाणे ते नवी मुंबई विमानतळाचा प्रवास होणार फक्त २० मिनिटांत! ६ हजार कोटींचा नवा मार्ग

SCROLL FOR NEXT